महिला हॉकीचा स्तर उंचावण्यावर भर : सोर्ड मारिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 06:00 AM2020-01-05T06:00:42+5:302020-01-05T06:00:46+5:30
भारतीय महिला हॉकी संघाचे कोच सोर्ड मारिन यांनी या महिन्याअखेर होणाऱ्या न्यूझीलंड दौ-याच्या तयारीत १७ दिवसांच्या शिबिरात स्तर उंचावण्यावर भर देण्याचे ठरविले आहे.
नवी दिल्ली : भारतीय महिला हॉकी संघाचे कोच सोर्ड मारिन यांनी या महिन्याअखेर होणाऱ्या न्यूझीलंड दौ-याच्या तयारीत १७ दिवसांच्या शिबिरात स्तर उंचावण्यावर भर देण्याचे ठरविले आहे. हॉकी इंडियाने शिबिरासाठी २५ खेळाडूंची निवड केली. भारतीय महिला हॉकी संघासाठी २०१९ हे यशस्वी वर्ष ठरले. संघ टोकियो आॅलिम्पिकसाठी पात्र ठरला. नव्या वर्षांची सुरुवात न्यूझीलंड दौºयाने होत आहे. भारत या संघाविरुद्ध चार सामने खेळणार असून एक सामना ब्रिटनविरुद्ध होईल. मारिन म्हणाले, आम्ही सर्वजण २०२० त चांगली कामगिरी करण्यावर आणि आव्हाने सर करण्यावर भर देणार आहोत. २५ खेळाडूंसह राष्टÑीय कोचिंग शिबिराला सुरुवात करीत आहोत.