इंग्लंडने न्यूझीलंडला २-० असे नमवून गाठली उपांत्यपूर्व फेरी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 04:45 AM2018-12-11T04:45:19+5:302018-12-11T04:46:03+5:30

इंग्लंडने सांघिक खेळाच्या जोरावर न्यूझीलंडचा २-० असा पराभव करत पहिल्या क्रॉसओव्हर सामन्यात वर्चस्व राखले.

England beat Queensland 2-0 to win quarter-final | इंग्लंडने न्यूझीलंडला २-० असे नमवून गाठली उपांत्यपूर्व फेरी

इंग्लंडने न्यूझीलंडला २-० असे नमवून गाठली उपांत्यपूर्व फेरी

Next

भुवनेश्वर : इंग्लंडने सांघिक खेळाच्या जोरावर न्यूझीलंडचा २-० असा पराभव करत पहिल्या क्रॉसओव्हर सामन्यात वर्चस्व राखले. यासह इंग्लंडने विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली असून आता त्यांचापुढे आॅलिम्पिक चॅम्पियन अर्जेंटिनाचे तगडे आव्हान असेल.

इंग्लंडकडून व्हिल कलनान (२५वे मिनिट) याने मैदानी गोल केला. तसेच, ४४व्या मिनिटाला ल्यूक टेलर याने पेनल्टी कॉर्नरवर जबरदस्त गोल करत संघाला भक्कम आघाडी मिळवून दिली. या विजयासह आत्मविश्वास उंचावलेला इंग्लंड संघ बुधवारी होणाऱ्या पहिल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात बलाढ्य अर्जेंटिनाच्या आव्हानाला सामोरे जाईल.

जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी असलेल्या इंग्लंडने एकहाती वर्चस्व राखताना न्यूझीलंडला पूर्णपणे दबाव टाकले. पहिल्या दोन क्वार्टरमध्ये आक्रमक हल्ले केलेल्या इंग्लंडविरुद्ध तिसºया क्वार्टरमध्ये न्यूझीलंडने जोरदार खेळ केला. पण, शेवटपर्यंत त्यांना इंग्रजांचा बचाव भेदण्यात यश आले नाही. यासह इंग्लंडने स्पर्धा इतिहासात अव्वल आठ संघात स्थान मिळवण्याची परंपराही कायम ठेवली.
दुसरीकडे झालेल्या अन्य लढतीत फ्रान्सने दुसºया क्रॉसओव्हर सामन्यात बाजी मारत चीनचे कडवे आव्हान १-० असे परतावले. यासह उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलेल्या फ्रान्सला पुढील सामन्यात बलाढ्य आॅस्टेÑलियाविरुद्ध भिडावे लागेल. सामन्यातील एकमेव गोल ३६व्या मिनिटाला टिमोथी क्लेमेंटने केला.

स्पर्धेत सहभागी देशांपैकी फ्रान्सचे जागतिक स्थान सर्वात कमी २०वे आहे. मात्र त्यांनी साखळी सामन्यात आॅलिम्पिक चॅम्पियन अर्जेंटिनाला ५-३ असा धक्का देत सर्वांना चकीत केले होते. यानंतर त्यांनी जागतिक क्रमवारीत १७व्या स्थानावरील चीनला नमवून दिमाखात आगेकूच केली आहे. चीनला त्यांचा संथ खेळ महागात पडला. (वृत्तसंस्था)

Web Title: England beat Queensland 2-0 to win quarter-final

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.