FIH Women's Hockey World Cup : भारतीय संघाची कसोटी, सलामीलाच इंग्लंडचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 04:57 PM2018-07-20T16:57:05+5:302018-07-20T16:59:37+5:30
आठ वर्षांनंतर पुनरागमन करणा-या आणि टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या पात्रतेचे लक्ष्य खुणावत असलेल्या भारतीय संघाची महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेच कसोटी लागणार आहे.
लंडन - आठ वर्षांनंतर पुनरागमन करणा-या आणि टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या पात्रतेचे लक्ष्य खुणावत असलेल्या भारतीय संघाची महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेच कसोटी लागणार आहे. 2017च्या आशिया चषक विजेत्या भारतीय संघाला सलामीच्याच सामन्यात यजमान इंग्लंडचा सामना करावा लागणार आहे. जागतिक क्रमावारीत इंग्लंड दुस-या, तर भारत दहाव्या स्थानावर आहे.
शनिवारपासून सुरू होत असलेल्या या स्पर्धेत भारताचे नेतृत्व संघातील अनुभवी खेळाडू राणी रामपाल करणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या स्पेन दौ-यात भारतीय संघाने चांगली कामगिरी केली आहे आणि त्यांच्याकडून विश्वचषक स्पर्धेत अशाच कामगिरीची अपेक्षा आहे. भारताला ब गटात इंग्लंडव्यतिरिक्त अमेरिका आणि आयर्लंड यांचा सामना करावा लागणार आहे.
The Vitality Hockey Women's World Cup London 2018 is all set to begin tomorrow where 16 teams will contend for the biggest prize of women’s hockey from 21st July onward. Here’s a look at the schedule of the opening day of this tournament tomorrow.#IndiaKaGame#HWC2018pic.twitter.com/cuAIBc5Hn3
— Hockey India (@TheHockeyIndia) July 20, 2018
स्पर्धेचे फॉरमॅशन : चार गटातील अव्वल चार संघांना थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळणार आहे, तर उर्वरीत चार जागांसाठी प्रत्येक गटातील दुस-या व तिस-या स्थानावरील संघ एकमेकांशी भिडणार आहेत.
अन्य संघ : अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, चीन, जर्मनी, इटली, जपान, कोरिया, नेदरलँड, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि स्पेन.
सर्वोत्तम कामगिरी : 1974च्या पहिल्याच स्पर्धेत पटकावलेले चौथे स्थान ही भारताची सर्वोत्तम कामगिरी आहे. कांस्यपदकाच्या लढतीत पश्चिम जर्मनीने 2-0 अशा फरकाने भारताला पराभूत केली होती.
संघाबद्दल इंटरेस्टींग : भारतीय संघातील 18 पैकी 16 खेळाडू प्रथमच विश्वचषक स्पर्धेत खेळणार आहेत. कर्णधार राणी आणि दीपिका हे या दोन वरिष्ठ खेळाडूंनी 2010ची विश्वचषक स्पर्धा खेळली होती.
भारतीय संघाचे वेळापत्रक
21 जुलै - भारत वि. इंग्लंड, सायं. 6.30 वा.
26 जुलै - भारत वि. आयर्लंड, सायं. 6.30 वा.
29 जुलै - भारत वि. अमेरिका, रात्री 9.30 वा.