FIH Women's Hockey World Cup : भारतीय संघाची आव्हान टिकवण्यासाठी धडपड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 03:12 PM2018-07-25T15:12:25+5:302018-07-25T15:12:49+5:30
FIH Women's Hockey World Cup स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत विजयाची संधी दवडल्यानंतर भारतीय महिला संघाची आव्हान टिकवण्यासाठी धडपड सुरू झाली आहे.
लंडन - FIH Women's Hockey World Cup स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत विजयाची संधी दवडल्यानंतर भारतीय महिला संघाची आव्हान टिकवण्यासाठी धडपड सुरू झाली आहे. इंग्लंडविरूद्धच्या सलामीच्या लढतीत भारताला अखेरच्या क्षणी विजयावर पाणी फेरावे लागले होते. इंग्लडने 54व्या मिनिटाला गोल करून सामना 1-1 असा बरोबरीत सोडवला. त्यामुळे गुरूवारी आयर्लंडविरूद्ध भारताला विजय मिळवणे अनिवार्य झाले आहे.
जागतिक क्रमवारीत भारतीय संघ 10व्या आणि आयर्लंड 16 व्या स्थानावर आहे. मात्र, त्यांना कमी लेखण्याची चूक प्रशिक्षक शोर्ड मरिन्ज करणार नाही. त्यांनी सातव्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेला 3-1 असे नमवले आहे आणि B गटात अव्वल स्थान पटकावले आहे. भारताविरूद्ध आयर्लंडने विजय मिळवल्यात त्यांचा बाद फेरीतील प्रवेश निश्चित होईल.
भारताला मात्र हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे. गतवर्षी जोहान्सबर्ग येथे झालेल्या जागतिक हॉकी लीग सेमीफायनल स्पर्धेत आयर्लंडने 2-1 असा विजय मिळवला होता. त्यामुळे भारतीय संघ त्या पराभवाची परतफेड करण्यासाठी उत्सुक आहे.
सामन्याची वेळ - सायंकाळी 6.30 वा.
Here's how the teams stand after an eventful opening day of the Vitality Hockey Women’s World Cup London 2018 on 21st July.#IndiaKaGame#HWC2018pic.twitter.com/lsVQUoZGsY
— Hockey India (@TheHockeyIndia) July 22, 2018