कोरियाविरुद्ध हरमनप्रीतची हॅट्ट्रिक,भारताचा ४-१ ने विजय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 03:37 AM2018-10-26T03:37:17+5:302018-10-26T03:37:30+5:30
हरमनप्रीतसिंग याने नोंदविलेल्या हॅट्ट्रिकच्या जोरावर भारताने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेच्या राऊंड रॉबिन फेरीत विजयी मोहीम कायम राखून द. कोरियाचा ४-१ ने पराभव केला.
मस्कत : हरमनप्रीतसिंग याने नोंदविलेल्या हॅट्ट्रिकच्या जोरावर भारताने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेच्या राऊंड रॉबिन फेरीत विजयी मोहीम कायम राखून द. कोरियाचा ४-१ ने पराभव केला. बुधवारी उशिरा रात्री झालेल्या लढतीत हरमनप्रीतने पाचव्या मिनिटाला संघाचे खाते उघडले. ४७ आणि ५९ व्या मिनिटाला आणखी दोन गोल नोंदवित त्याने स्पर्धेत तिसऱ्या हॅट्ट्रिकची नोंद केली. याआधी दिलप्रित सिंग आणि पाकिस्तानचा अलीम बिलाल यांनी हॅट्ट्रिक नोंदविली आहे.
भारताकडून गुरजंतसिंग यानेही दहाव्या मिनिटाला गोल केला. द. कोरियासाठी ली सिऊनजील याने २० व्या मिनिटाला मैदानी गोल नोंदविला. भारताचे पाच सामन्यात १३ गुण झाले असून नोंदविलेल्या गोलची संख्या २५ अशी झाली. मलेशियाचे चार सामन्यात दहा गुण आहेत. गुणतालिकेत पाकिस्तान तिसºया आणि जपान चौथ्या स्थानावर आहे. भारत, मलेशिया, पाक आणि जपान यांनी आधीच उपांत्य फेरी गाठली, हे विशेष. मलेशियाविरुद्ध गोलशून्य बरोबरीत राहिलेल्या सामन्यानंतर भारताने कोरियाविरुद्ध आक्रमक सुरुवात केली.
पाचव्या मिनिटाला पेनल्टी
कॉर्नर मिळताच हरमनने त्यावर
गोल केला. कोरियानेही हल्ले सुरू करताचा जागतिक क्रमवारीत
पाचव्या स्थानी असलेल्या भारताने देखील प्रत्युत्तर दिले. हरमनने
डी च्या आत दिलेल्या पासवर
गुरजंतने रिव्हर्स हिट करीत गोल नोंदविला. (वृत्तसंस्था)
>दक्षिण कोरियाने आघाडीची संधी घालवली
दुसºया क्वार्टरमध्ये कोरियाने खाते उघडताच मध्यांतराच्यावेळी भारत २-१ ने पुढे होता. तिसºया क्वार्टरमध्ये कोरियाने लगेच गोल नोंदविला होता पण भारतीय खेळाडूंनी रेफ्रल घेताच पंचांनी गोल अमान्य केला.
चौथ्या क्वार्टरमध्ये हरमनने तिसरा गोल केला. दुसरीकडे कोरियाला मिळालेले दोन्ही पेनल्टी कॉर्नर वाया गेले. हरमनने ५९ व्या मिनिटाला आणखी एक गोल नोंदवून भारताचा ४-१ ने विजय निश्चित केला.
>पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदविण्यात यश आल्याबद्दल मी आंनदी आहे. मी माझ्या खेळावर फोकस केल्यामुळे पाठोपाठ गोल नोंदविण्यात यशस्वी झालो.’ शनिवारी भारताला उपांत्य सामना खेळायचा आहे.
- हरमनप्रीत