भारतीय महिला संघाच्या राष्ट्रीय शिबिरासाठी हॉकी इंडियाने ३३ खेळाडूंची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 03:23 AM2017-11-26T03:23:44+5:302017-11-26T03:23:47+5:30
उद्यापासून बंगळुरू येथील साई सेंटर येथे होणा-या भारतीय महिला संघाच्या राष्ट्रीय शिबिरासाठी हॉकी इंडियाने ३३ खेळाडूंची निवड केली आहे. हे सर्व खेळाडू मुख्य प्रशिक्षक हरेंद्र सिंह यांच्याकडे रिपोर्ट करतील.
नवी दिल्ली : उद्यापासून बंगळुरू येथील साई सेंटर येथे होणा-या भारतीय महिला संघाच्या राष्ट्रीय शिबिरासाठी हॉकी इंडियाने ३३ खेळाडूंची निवड केली आहे. हे सर्व खेळाडू मुख्य प्रशिक्षक हरेंद्र सिंह यांच्याकडे रिपोर्ट करतील. महिला संघाने नुकताच चीनचा पराभव करीत आशिया चषक पटकाविला होता. या शानदार कामगिरीमुळे महिला संघाने लंडन येथे होणा-या विश्वचषकासाठी पात्रता मिळविली होती तसेच हा संघ विश्व मानांकनात दहाव्या स्थानावर पोहचला होता.
यासंदर्भात, प्रशिक्षक हरेंद्र सिंह म्हणाले, की २०१८ हे वर्ष भारतीय हॉकीसाठी महत्त्वपूर्ण आहे. आता राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धा आणि विश्वचषक या मोठ्या स्पर्धा असतील. या सर्व स्पर्धांवर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. आता आमचे लक्ष्य हे राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत अंतिम फेरी गाठणे हे आहे.
निवड झालेले महिला खेळाडू
गोलरक्षक - सविता, रजनी ई, स्वाती. बचावपटू : दीप ग्रेस इक्का, पी सुशीला चानू, सुनीता लाकरा, गुरजीत कौर, एच. उल रूआत फेली, नवदीप कौर, रश्मिता मिज, नीलू दहिया. मध्यरक्षक - नमिता टोप्पो, निक्की प्रधान, दीपिका, करिश्मा यादव, रेणुका यादव, नवजोत कौर, मोनिका, लिलिमा मिज, नेहा गोयल, उदिता, एम. लिली चानू, निलांजली राय.
आघाडीपटू - राणी रामपाल, वंदना कटारिया, प्रीती दुबे, रिना खोखार, अनुपा बारला, सोनिका, लालरेम्सियामी, पूनम राणी, नवनीत कौर, नवप्रीत कौर.