हॉकीत पाकला दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 02:23 AM2017-10-16T02:23:33+5:302017-10-16T03:07:25+5:30

जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जात असलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाने पाकवरचे वर्चस्व कायम राखताना रविवारी परंपरागत प्रतिस्पर्धी संघाचा ३-१ ने पराभव केला आणि आशिया कप हॉकी स्पर्धेत ‘अ’ गटात अव्वल स्थान पटकावले.

 Hockey pakala baka, hockey pakala dama | हॉकीत पाकला दणका

हॉकीत पाकला दणका

Next

ढाका : जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जात असलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाने पाकवरचे वर्चस्व कायम राखताना रविवारी परंपरागत प्रतिस्पर्धी संघाचा ३-१ ने पराभव केला आणि आशिया कप हॉकी स्पर्धेत ‘अ’ गटात अव्वल स्थान पटकावले.
भारताने जापानविरुद्ध ५-१ ने, तर बांगलादेशविरुद्ध गेल्या लढतीत ७-० ने विजय मिळवत राऊंड रॉबिन सुपर चारमध्ये आपले स्थान निश्चित केले होते. भारताला पाककडून अपेक्षेनुसार कडवे आव्हान मिळाले, पण भारताने विजय मोहीम कायम राखत तीन सामन्यांनंतर ९ गुणांची कमाई केली.
भारतातर्फे चिंगलेनसाना सिंग (१७ वा मिनिट), रमणदीप सिंग (४४ वा मिनिट) आणि हरमनप्रीत सिंग (४५ वा मिनिट) यांनी गोल नोंदवले, तर पाकिस्तानतर्फे एकमेव गोल अली शाह (४८ वा मिनिट) याने केला. या पराभवानंतरही पाकिस्तान संघ चार गुणांसह जपानच्या तुलनेत सरस गोल फरकाच्या आधारावर सुपर चारमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला.
जपानने यापूर्वी यजमान बांगलादेशचा ३-१ ने पराभव केला होता, पण तरी त्यांना सुपर चारमध्ये स्थान मिळवता आले नाही. याचा अर्थ या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान आणखी एक लढत बघण्याची संधी मिळणार आहे.
सामन्यात पाकिस्तानला पहिल्या पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदविता आला नाही. भारताने दुसºया क्वार्टरमध्ये शानदार खेळ केला आणि १७ व्या मिनिटाला चिंगलेनसाना सिंगने आकाशदीप सिंगच्या पासवर पहिल्या गोल नोंदवला. आणखी एका पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याची संधी गमावल्यानंतर पाकिस्तानने आक्रमक खेळ केला, पण युवा गोलकीपर करकेराने मोहम्मद अतीकच्या फटक्यावर शानदार बचाव करीत पाकचे गोल नोंदविण्याचे प्रयत्न हाणून पाडले. मध्यंतराला खेळ थांबला त्या वेळी भारत १-० ने आघाडीवर होता. भारताने त्यानंतर करकेराच्या स्थानी चिकटेला गोलकीपर म्हणून संधी दिली. त्याने ४० व्या मिनिटाला शानदार बचाव केला. दरम्यान, भारताने पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदविण्याची संधी गमावली. पाकिस्तानला तिसºया पेनल्टी कॉर्नरचाही लाभ घेता आला नाही. ४४ व्या मिनिटाला रमणदीप सिंगने हरमनप्रीतच्या शानदार क्रॉसवर चेंडूला गोलजाळ्याचा मार्ग दाखवित संघातर्फे दुसरा गोल नोंदवला. पुढच्याच मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्यावर हरमनप्रीतने गोल नोंदवित भारताला ३-० अशी आघाडी मिळवून दिली.
(वृत्तसंस्था)



पाकिस्तानने चौथ्या क्वार्टरमध्ये शानदार कामगिरी केली. त्यांनी ४९ व्या मिनिटाला संघाचे खाते उघडले. पाकला त्यानंतर चौथा पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण चिकटेने त्यावर अप्रतिम बचाव केला. भारताने त्यानंतर जोरदार प्रत्युत्तर देताना तीन पेनल्टी कॉर्नर मिळवले, पण त्यापैकी कुठल्याही पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदविता आला नाही. सुपर चारच्या लढतींना १८ आॅक्टोबरपासून प्रारंभ होणार आहे. त्यात भारत व पाकिस्तान यांच्या व्यतिरिक्त ‘ब’गटातील अव्वल दोन संघ सहभागी होतील. मलेशियाने यापूर्वीच पुढची फेरी गाठली आहे तर ‘ब’ गटातील दुसरा संघ चीन व दक्षिण कोरिया यांच्यादरम्यान सोमवारी खेळल्या जाणाºया लढतीनंतर निश्चित होईल.

पाकिस्तानविरुद्ध आजच्या विजयात भारतातर्फे गोलकीपर सूरज करकेरा व आकाश चिकटे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सूरजने पहिल्या हाफमध्ये पाकला एकही गोल करण्याची संधी दिली नाही, तर चिकटेने दुसºया हाफमध्ये त्यांची अनेक आकमणे परतावून लावली.

भारताने अखेरचा क्वार्टर वगळता पहिल्या तीन क्वार्टरमध्ये वर्चस्व गाजवले. पाकिस्तानने ०-३ ने पिछाडीवर पडल्यानंतर अखेरच्या क्वार्टरमध्ये आक्रमक खेळ केला, पण भारताने वर्चस्व कायम राखले. त्यात यंदा सुरुवातीला लंडनमध्ये विश्व हॉकी लीगमध्ये मिळवलेल्या सलग दोन विजयांचा समावेश आहे.
 

Web Title:  Hockey pakala baka, hockey pakala dama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Hockeyहॉकी