हॉकी मालिका : न्यूझीलंडला व्हाईटवॉश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 10:48 PM2018-07-22T22:48:30+5:302018-07-22T22:48:50+5:30
भारताची तिसऱ्या सामन्यात ४-० ने मात
बंगलोर : भारतीय पुरुष हॉकी संघाने तिसºया व अंतिम हॉकी सामन्यात विजय मिळवत न्यूझीलंडला व्हाईट वॉश दिला. भारताने हा सामना
४-० असा जिंकला. भारताकडून रुपिंदर पाल सिंग, सुरेंद्र कुमार, मनदीप सिंग व आकाशदीप सिंग यांनी गोल केले.
सामन्याच्या पूर्वार्धात मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर रुपिंदरने गोल करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. स्पर्धेतील
हा त्याचा चौथा गोल होता.
त्यानंतर लगेचच रुपिंदरच्या पासवर सुरिंंदरने गोल करत आघाडी दुप्पट केली.
मधल्या फळीतील अनुभवी सरदार सिंग व सिमरनजीत सिंग यांनी दिलेल्या पासवर मनदीप गोल करत भारताला ३-० अशी आघाडी मिळवून दिली. आकाशदीप सिंग याने गोल करत ४-० अशी भक्कम आघाडी केली. सामना संपेपर्यंत ही आघाडी कायम राहिली.
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक हरेंद्र सिंग म्हणाले, ‘इंडोनेशियामध्ये १८ आॅगस्टपासून होणाºया आशियाई स्पर्धेपूर्वी भारताने मिळवलेला
हा मालिका विजय महत्त्वाचा
आहे. आशियाई स्पर्धेत खेळण्यापूर्वी रॅँकिंगमध्ये पहिल्या दहा
संघांत समाविष्ट असलेल्या संघाबरोबर खेळल्याचा
आम्हाला फायदा झाला. या तीनही सामन्यांत आम्ही वेगवेगळे प्रयोग करून पाहिले.’