Hockey World Cup 2018: भारताचा उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश पक्का, पण...

By स्वदेश घाणेकर | Published: December 3, 2018 09:38 AM2018-12-03T09:38:12+5:302018-12-03T09:48:30+5:30

Hockey World Cup 2018 : भुवनेश्वर, हॉकी विश्वचषक स्पर्धा: भारतीय पुरुष हॉकी संघाने हॉकी विश्वचषक स्पर्धेत अनपेक्षित कामगिरी केली. ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या बेल्जियम संघाला त्यांनी 2-2 अशा बरोबरीवर समाधान मानण्यास भाग पाडले.

Hockey World Cup 2018 : Indian men's hockey team almost qualify for quarter finals | Hockey World Cup 2018: भारताचा उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश पक्का, पण...

Hockey World Cup 2018: भारताचा उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश पक्का, पण...

Next

- स्वदेश घाणेकर

भुवनेश्वर, हॉकी विश्वचषक स्पर्धा: भारतीय पुरुष हॉकी संघाने हॉकी विश्वचषक स्पर्धेत अनपेक्षित कामगिरी केली. ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या बेल्जियम संघाला त्यांनी 2-2 अशा बरोबरीवर समाधान मानण्यास भाग पाडले. गोल्सची वेळ पाहता बेल्जियमने भारताचा विजयाचा घास पळवला असे अनेकांना वाटेल, परंतु भारताने 0-1 अशा पिछाडीवरून मारलेली मुसंडी बेल्जियमला थक्क करणारी ठरली. या निकालासह भारताने उपांत्यपूर्व फेरीच्या दिशेने मोठी झेप घेतली आहे. पण, त्यांचा हा उपांत्यपूर्व फेरीतील थेट प्रवेश जर-तरच्या समीकरणात अडकला आहे. 


पहिल्या 30 मिनिटांच्या खेळात भारताचा खेळ समाधानकारक झाला नाही. बेल्जियमने पहिल्या सेकंदापासून सामन्यावर घेऊ पाहिलेली पकड, भारतीय खेळाडूंना चक्रावून सोडणारी होती. त्यामुळे त्यांना गोल खावा लागला, परंतु मध्यंतरानंतर भारतीय खेळाडूंनी चमत्कारिक खेळ केला. हाफ टाईमच्या ब्रेकमध्ये भारतीय खेळाडूंनी केलेला आक्रमणाचा निर्धार शेवटपर्यंत कायम राखला. भारताने उत्तम समन्वयाचा खेळ केला. वरूण कुमार, ललित उपाध्याय, कोठाजीत सिंग यांचा खेळ महत्त्वाचा ठरला. सिमरनजीय सिंगने योग्य वेळी योग्य ठिकाणी उभे राहून केलेला गोल महत्त्वाचा ठरला.



भारताने 31 वेळा बलाढ्य बेल्जियमचा सामना केला आणि भारताने 13 विजय मिळवले आहेत. आजचा निकाल पकडता चार सामने अनिर्णीत राखले आहेत, तर 14 सामने गमावले आहेत. यापैकी मागील पाच वर्षांत 19 सामन्यांत भारताला 13 पराभव पत्करावे लागलेत. त्यामुळे आजचा हा निकाल बरेच काही सांगणारा आहे. भारतीय खेळाडूंची सर्वात कमकुवत बाब म्हणजे त्याची फिटनेस... पण रविवारच्या सामन्यात भारतीय खेळाडू त्याही परीक्षेत उत्तीर्ण झाले. त्यांच्यासमोर बेल्जियमचे खेळाडू दमले. त्यामुळे 2-1 अशा आघाडीनंतर 2-2 अशा बरोबरीवर समाधान मानावे लागूनही भारताने जागतिक क्रमवारीत आघाडीवर असलेल्या बेल्जियमला रोखलं, असं म्हणणे चुकीचे ठरणार नाही.


या निकालाने भारताला 'C' गटात 4 गुणांसह आघाडीवर ठेवले आहे. बेल्जियमच्या खात्यातही 4 गुण आहेत, परंतु भारताचा गोलफरक हा 5 असा आहे. बेल्जियमचा गोलफरक 1 असा आहे. त्यामुळे भारताचे उपांत्यपूर्व फेरीत थेट प्रवेश मिळवणे जवळपास पक्के आहे. त्यासाठी भारताला शेवटच्या साखळी सामन्यात 1-1 अशी बरोबरीही पुरेशी आहे. मात्र, त्याचवेळी बेल्जियमने अखेरच्या साखळी सामन्यात 6 पेक्षा अधिक गोलफरकाने विजय मिळवल्यास भारताचा प्रवेश लांबणीवर पडेल. 


Web Title: Hockey World Cup 2018 : Indian men's hockey team almost qualify for quarter finals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.