Hockey World Cup 2018 : भारतीय संघ आज दक्षिण आफ्रिकेशी भिडणार, जाणून घ्या वेळापत्रक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 02:47 PM2018-11-28T14:47:46+5:302018-11-28T14:51:05+5:30

Hockey World Cup 2018: पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. 1975 नंतर भारतीय संघ विश्वचषक उंचवण्यासाठी प्रयत्नशील आहे.

Hockey World Cup 2018: The Indian team will now face South Africa in opening match, know the schedule | Hockey World Cup 2018 : भारतीय संघ आज दक्षिण आफ्रिकेशी भिडणार, जाणून घ्या वेळापत्रक

Hockey World Cup 2018 : भारतीय संघ आज दक्षिण आफ्रिकेशी भिडणार, जाणून घ्या वेळापत्रक

Next
ठळक मुद्देपुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात 1975 नंतर विश्वचषक उंचवण्यासाठी भारत प्रयत्नशील भारताला सलामीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सामना

भुवनेश्वर, हॉकी विश्वचषक स्पर्धा : पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. 1975 नंतर भारतीय संघ विश्वचषक उंचवण्यासाठी प्रयत्नशील आहे. आत्मविश्वास उंचावलेला भारतीय संघ कलिंगा स्टेडियममध्ये घरच्या प्रेक्षकांपुढे आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. आठवेळा ऑलिम्पिक विजेत्या भारतीय संघाने 1975 मध्ये एकमेव विश्वविजेतेपद पटकावले होते. त्यावेळी अजितपाल सिंग आणि त्याच्या संघाने इतिहास घडवला होता. 



आशियातील दिग्गज भारतीय संघाला 1975 नंतर नेदरलँड, जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया या संघाची बरोबरी साधण्यात अपयश आले. गेल्या चार दशकांत युरोपियन संघांनी विश्व हॉकीवर वर्चस्व कायम राखले आहे. भारताने 1975 नंतर सर्वोत्तम कामगिरी मुंबईमध्ये 1982 मध्ये झालेल्या विश्वकप स्पर्धेत केली होती. त्यावेळी भारतीय संघ पाचव्या स्थानी होती. गेल्या 43वर्षांत भारतीय संघाला विश्वकप स्पर्धेत पदक पटकावता आलेले नाही. 


जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेला भारतीय संघ यावेळी पदक पटकावत ती उणीव भरून काढण्यास उत्सुक आहे. भारतासाठी मात्र हे सोपे नाही. कारण त्यांना दोनवेळचा गतविजेता ऑस्ट्रेलिया, नेदरलँड, जर्मनी आणि ऑलिम्पिक चॅम्पियन अर्जेंटिना यांच्यासारख्या दिग्गज संघाचे आव्हान राहणार आहे. याव्यतिरिक्त यजमान संघावर अपेक्षांचे दडपणही राहणार आहे. 




भारतापुढे बेल्जियम, कॅनडाचे आव्हान
हरेंद्र यांनी विश्वकप विजेता ज्युनिअर संघातील सात खेळाडूंना सध्याच्या संघात संधी दिली आहे. ड्रॅगफ्लिकर रुपिंदर पाल सिंगला संघातून वगळण्यात आले असून स्टायकर एस.व्ही. सुनील दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. 16 देशांचा समावेश असलेल्या स्पर्धेत यजमान भारतासह दक्षिण आफ्रिका, बेल्जियम आणि कॅनडा या संघांचा ‘क’गटात समावेश आहे.

भारतीय संघाचे वेळापत्रक
28 नोव्हेंबरः भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका ( सायंकाळी 7 वाजता)
2 डिसेंबरः भारत विरुद्ध बेल्जियम ( सायंकाळी 7 वाजता)
8 डिसेंबरः भारत विरुद्ध कॅनडा ( सायंकाळी 7 वाजता) 



भारतीय संघ
पी. आर. श्रीजेश, कृष्णा पाठक, हरमनप्रीत सिंग, बिरेंद्र लाक्रा, वरुण कुमार, कोठाजीत सिंग, सुरेंदर कुमार, अमित रोहिदास, मनप्रीत सिंग (कर्णधार), चिंग्लेनसाना सिंग, निलकांत शर्मा, हार्दिक सिंग, सुमित, आकाशदीप सिंग, मनदीप सिंग, दिलप्रीत सिंग, ललित उपाध्ये आणि सिमरनजीत सिंग. 
थेट प्रक्षेपण
स्टार स्पोर्ट्स, हॉटस्टार अॅप, जिओ टीव्ही आणि एअरटेल टीव्ही 

Web Title: Hockey World Cup 2018: The Indian team will now face South Africa in opening match, know the schedule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.