हॉकी वर्ल्ड लीगमध्ये भारतानं जर्मनीचा 2-1नं पराभव करत मिळवलं कांस्यपदक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2017 07:34 PM2017-12-10T19:34:57+5:302017-12-11T01:19:17+5:30

भुवनेश्वर- हॉकी वर्ल्ड लीगमध्ये भारतानं जर्मनीचा 2-1नं पराभव करत कांस्यपदकावर पुन्हा एकदा नाव कोरलं आहे.

In the Hockey World League, India won the bronze medal with Germany defeating Germany 2-1 | हॉकी वर्ल्ड लीगमध्ये भारतानं जर्मनीचा 2-1नं पराभव करत मिळवलं कांस्यपदक

हॉकी वर्ल्ड लीगमध्ये भारतानं जर्मनीचा 2-1नं पराभव करत मिळवलं कांस्यपदक

Next

भुवनेश्वर : हॉकी विश्व लीग स्पर्धेत पुन्हा एकदा सुवर्ण पदक मिळवण्यात अपयशी ठरल्यानंतर भारतीयांनी कांस्य पदकाच्या निर्णायक लढतीत जर्मनीचा 2-1 असा पाडाव करत बाजी मारली. सुवर्णपदकाच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतरही प्रेक्षकांनी भारतीय संघाला प्रोत्साहन द्यायला मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. या जोरावरच भारतीय खेळाडूंनी कांस्यपदक निसटू दिले नाही.
एस. व्ही. सुनील (21वे मिनिट) आणि हरमनप्रीत सिंग (54) यांनी प्रत्येकी एक गोल करत भारताचे कांस्य पदक निश्चित करण्यात मोलाचे योगदान दिले. त्याचवेळी मार्क अ‍ॅपेल याने जर्मनीचा एकमेव गोल साकारला. विशेष म्हणजे मार्क या सामन्यात गोलरक्षक ऐवजी मध्यक्रम फळीमध्ये खेळत होता. दरम्यान, खेळाडूंच्या दुखापतीमुळे जर्मनीने या सामन्यात आपल्या अनेक राखीव खेळाडूंना मैदानात उतरवले होते.

रायपूर येथे झालेल्या गतस्पर्धेतही भारताने कांस्य पदक पटकावले होते. यंदा मात्र भारताला पदकाचा रंग बदलण्याची नामी संधी होती. परंतु, उपांत्य सामन्यात बलाढ्य अर्जेंटिनाविरुद्ध झालेल्या निसटत्या पराभवामुळे यजमानांना पुन्हा एकदा कांस्य पदकाच्या लढतीत खेळावे लागले. या सामन्यात जर्मनीने 7 पेनल्टी कॉर्नर मिळवले खरे, परंतु त्यावर एकही गोल करण्यात त्यांना यश आले नाही. दरम्यान साखळी सामन्यात जर्मनीने भारताला 2-0 असा धक्का दिला होता. या पराभवाचा वचपाही यावेळी भारताने काढला. आक्रमक सुरुवात केलेल्या जर्मनीने दोन्ही क्वार्टरमध्ये एकूण सहा पेनल्टी कॉर्नर मिळवले. मात्र भारतीयांनी आपल्या भक्कम बचावाच्या जोरावर त्यांना यश मिळवू दिले नाही. यानंतर भारताने आक्रमक चाल रचली आणि गोलक्षेत्रामध्ये सुनीलने सर्व सूत्रे आपल्याकडे घेत अप्रतिम गोल करत भारताला आघाडीवर नेले. त्याचवेळी पेनल्टी कॉर्नरची संधी दडवण्याची जर्मनीची मालिका कायम राहिल्याने त्यांच्यावरचे दडपण स्पष्ट जाणवू लागले होते. त्याचवेळी पाच मिनिटांनंतर सुमित आणि आकाशदीप यांच्याकडून मिळालेल्या पासवर गोल करण्यात सुनील अपयशी ठरल्याने भारताची आघाडी आणखी वाढली नाही.

मध्यंतराला 1-0 असे नियंत्रण राखलेल्या भारताने दुस-या सत्रात आक्रमक खेळ केला. यावेळी दुस-या सत्राच्या तिस-याच मिनिटाला आकाशदीपने जर्मन गोलपोस्टवर हल्ला केला, परंतु त्याचा फटका गोलरक्षक तोबियास बॉल्टर याने अडवला. यानंतर तिस-या मिनिटाला अ‍ॅपेलने महत्त्वपूर्ण गोल करत जर्मनीला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. या दरम्यान डॅन अँगुयेन याला ग्रीनकार्ड दाखविल्याने जर्मनीला 9 खेळाडूंसह खेळावे लागले. चौथ्या सत्रापर्यंत दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. मात्र, अखेरच्या काही मिनिटांमध्ये भारताने जबरदस्त खेळ करताना दोन मिनिटांमध्ये तीन पेनल्टी कॉर्नर मिळवले आणि त्यातील अखेरच्या पेनल्टी कॉर्नर हरमनप्रीतने निर्णायक गोल करताना भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

Web Title: In the Hockey World League, India won the bronze medal with Germany defeating Germany 2-1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Hockeyहॉकी