विश्वकप हॉकी स्पर्धेसाठी संघ जाहीर, भारतीय संघातून रुपिंदर, सुनील यांना वगळले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2018 02:42 AM2018-11-09T02:42:10+5:302018-11-09T02:42:32+5:30
मनप्रित सिंग २८ नोव्हेंबरपासून भुवनेश्वरमध्ये प्रारंभ होत असलेल्या एफआयएच विश्वकप स्पर्धेत भारताच्या १८ सदस्यांच्या संघाचे नेतृत्व करणार आहे.
नवी दिल्ली : मनप्रित सिंग २८ नोव्हेंबरपासून भुवनेश्वरमध्ये प्रारंभ होत असलेल्या एफआयएच विश्वकप स्पर्धेत भारताच्या १८ सदस्यांच्या संघाचे नेतृत्व करणार आहे. गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या हॉकी संघात अनुभवी रुपिंदर पालसिंग आणि एस.व्ही. सुनील यांना संधी मिळालेली नाही. अनुभवी स्ट्रायकर सुनीलला राष्ट्रीय शिबिरादरम्यान गुडघ्याला दुखापत झाली होती. तेव्हापासून त्याच्या खेळण्याबाबत साशंकता होती. गेल्या महिन्यात मस्कटमध्ये आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेपूर्वी ही दुखापत झाली होती. रुपिंदर पालकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष करण्यात आले. गेल्या महिन्यात झालेल्या स्पर्धेसाठीही त्याची निवड झाली नव्हती. सुनील या स्पर्धेत खेळला नव्हता. स्पर्धेत पावसामुळे अंतिम लढत शक्य न झाल्याने भारत आणि पाकिस्तान संघांना संयुक्त विजेता घोषित करण्यात आले होते.
भारतीय संघ
गोलकिपर : पी.आर. श्रीजेश, कृष्ण बहादूर पाठक. डिफेंडर : हरमनप्रीत सिंग, बीरेंद्र लाकडा, वरुण कुमार, कोथाजित सिंग खादांगबम, सुरेंद्र कुमार, अमित रोहिदास. मिडफिल्डर : मनप्रीत सिंग (कर्णधार), चिंगलेनसाना सिंग खांगजुम (उपकर्णधार), निलकांत शर्मा, हार्दिक सिंग, सुमित. फॉरवर्ड : आकाशदीप सिंग, मंदीप सिंग, दिलप्रित सिंग, ललित कुमार उपाध्याय, सिमरनजित सिंग.