भारत आशियाई चॅम्पियन! मलेशियाला नमवून तिसऱ्यांदा पटकावले आशिया चषकाचे विजेतेपद   

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2017 06:41 PM2017-10-22T18:41:39+5:302017-10-22T18:56:20+5:30

जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या  भारतीय हॉकी संघाने आशिया चषकाच्या विजेतेपदाला गवसणी घातली आहे. आज झालेल्या अंतिम लढतीत भारताने मलेशियावर 2-1 अशी मात करत आशिया चषक हॉकीचे विजेतेपद पटकावले.  

India Asian champion! Asia Cup title defeated by Malaysia | भारत आशियाई चॅम्पियन! मलेशियाला नमवून तिसऱ्यांदा पटकावले आशिया चषकाचे विजेतेपद   

भारत आशियाई चॅम्पियन! मलेशियाला नमवून तिसऱ्यांदा पटकावले आशिया चषकाचे विजेतेपद   

Next

ढाका - जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या  भारतीय हॉकी संघाने आशिया चषकाच्या विजेतेपदाला गवसणी घातली आहे. आज झालेल्या अंतिम लढतीत भारताने मलेशियावर 2-1 अशी मात करत आशिया चषक हॉकीचे विजेतेपद पटकावले.  रमणदीप सिंग आणि ललित उपाध्याय यांनी प्रत्येकी एक गोल करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.  
आशिया चषक हॉकीतील भारताचे हे तिसरे विजेतेपद आहे. याआधी 2003 साली मलेशियातील क्वालालंपूर  येथे आणि  2007 साली मायदेशातील चेन्नई येथे झालेल्या स्पर्धेत भारताने विजेतेपदाला गवसणी घातली होती. तर 2013 साली  मलेशियातील इपोह येथे झालेल्या स्पर्धेत दक्षिण कोरियाकडून पराभूत होऊन भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. 

आज झालेल्या अंतिम लढतीत भारतीय संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. रमणदीप सिंगने तिसऱ्या मिनिटालाच गोल करून भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 29 व्या मिनिटाला ललित उपाध्यायने गोल करून भारताची आघाडी 2-0 अशी वाढवली. मध्यांतराला 2-0 अशी आघाडी घेणाऱ्या भारतीय संघाचा खेळ उत्तरार्धात काहीसा मंदावला. त्यातच मलेशियाच्या आघाडीच्या फळीने वारंवार आक्रमणे करून भारताच्या बचावफळीला दबावात आणले. त्यातच 50 व्या मिनिटाला शाहरिल शाबाह याने मलेशियासाठी पहिला गोल करून भारताची आघाडी 2-1 अशी कमी केली. मात्र अखेपर्यंत आपली आघाडी टिकवत भारतीय संघाने विजेतेपदावर नाव कोरले. 



 दरम्यान, काल झालेल्या सुपर फोर लढतीत  भारताने परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ४-० ने धुव्वा उडवत दहाव्या आशिया कप हॉकी स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला होता. या लढतीतील चारही गोल लढतीच्या दुस-या हाफमध्ये नोंदविले गेले होते. या स्पर्धेत साखळी फेरीत भारताने पाकविरुद्ध मोठ्या फरकाने विजय नोंदवला होता. पाकिस्तान संघ सुपर फोरमध्ये भारताला कडवी झुंज देईल, अशी अपेक्षा होती, पण भारताच्या आघाडीच्या फळीने चमकदार कामगिरी करीत प्रतिस्पर्धी संघाला कुठलीही संधी दिली नाही. 

Web Title: India Asian champion! Asia Cup title defeated by Malaysia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Hockeyहॉकी