भारताला अव्वल स्थान मिळू शकते; कर्णधार पी. आर. श्रीजेशला विश्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 01:47 AM2018-06-09T01:47:55+5:302018-06-09T01:47:55+5:30
एफआयएच चॅम्पियन्स ट्रॉफी भारतीय हॉकी संघ अव्वल स्थान मिळवू शकतो, असा आत्मविश्वास कर्णधार पी. आर. श्रीजेश याने व्यक्त केला. स्पर्धेचे आयोजन नेदरलँड्समधील ब्रेडा येथे २३ जूनपासून होत आहे.
बेंगळुरु : एफआयएच चॅम्पियन्स ट्रॉफी भारतीय हॉकी संघ अव्वल स्थान मिळवू शकतो, असा आत्मविश्वास कर्णधार पी. आर. श्रीजेश याने व्यक्त केला. स्पर्धेचे आयोजन नेदरलँड्समधील ब्रेडा येथे २३ जूनपासून होत आहे. दुखापतीतून सावरलेल्या श्रीजेशने विश्वचषकाआधी स्वत:ला तपासून पाहण्याची चॅम्पियन्स ट्रॉफी सुवर्ण संधी असेल, असे सांगितले.
आमच्याकडे युवा आणि अनुभवी खेळाडूंचा चांगला समन्वय असून तयारी देखील चांगलीच झाली आहे. सर्वोत्कृष्ट खेळ केल्यास आम्ही अव्वल स्थानावर राहूच शकतो. विजयासाठी लहान लहान चुका टाळायला हव्यात.भुवनेश्वर येथे
नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यात होणाऱ्या विश्वचषकाआधी अन्य संघांच्या तुलनेत आमञही कुठे आहोत, हे तपासून पाहण्याची चांगली संधी या स्पर्र्धेीच्या निमित्ताने असेल, असे श्रीजेश म्हणाला.
फिल्ड गोल करण्यात अपयशी ठरलेला भारतीय संघ गोल्ड कोस्ट राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेत पदक जिंकू शकला नव्हता. त्यानंतर मुख्य कोच हरेंद्रसिंग यांनी खेळाडूंवर कठोर मेहनत घेतली आहे. यासंदर्भात श्रीजेश पुढे म्हणाला,‘आम्ही स्ट्रायकिंग सर्कलमधील पोझिशनवर कठोर मेहनत घेतली. राषष्टÑकुलमधील चुका कशा दूर करता येतील यावर कोच हरेंद्र यांनी वारंवार समजावून सांगितले.’ (वृत्तसंस्था)
उपकर्णधार चिंग्लेनसनासिंग म्हणाला, ‘आमचा संघ राष्टÑकुलमधील खराब कामगिरीतून सावरला आहे. शिबिरात विविध बाबींवर फोकस होता. ताळमेळ साधण्यावर भर देण्यात आल्याने सुवर्णपदक जिंकण्याइतपत आत्मविश्वास संचारला आहे.’ भारताला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळायचे आहे.