भारताचा आॅस्ट्रेलियाकडून २-४ असा पराभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 02:15 AM2018-03-07T02:15:24+5:302018-03-07T02:15:24+5:30
पहिल्या तीन क्वार्टरमध्ये केलेल्या खराब खेळामुळे भारताला मंगळवारी येथे आॅस्ट्रेलियाकडून २-४ असा पराभव पत्करावा लागला. या निराशाजनक कामगिरीसह भारत २७ व्या सुलतान अजलन शाह कप हॉकीच्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. भारता तिस-या क्वार्टरपर्यंत ०-४ असा पिछाडीवर होता.
इपोह - पहिल्या तीन क्वार्टरमध्ये केलेल्या खराब खेळामुळे भारताला मंगळवारी येथे आॅस्ट्रेलियाकडून २-४ असा पराभव पत्करावा लागला. या निराशाजनक कामगिरीसह भारत २७ व्या सुलतान अजलन शाह कप हॉकीच्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.
भारता तिस-या क्वार्टरपर्यंत ०-४ असा पिछाडीवर होता. मात्र रमणदीप सिंह (५२ मिनिट आणि ५३ मिनिट) याने चौथ्या क्वार्टरमध्ये दोन गोलचे अंतर कमी केले. आॅस्ट्रेलियाकडून मार्क नोल्स (२८ मिनिट), एरेन जालेवस्की (३५), डॅनियर बिले (३८) आणि ब्लॅक गोवर्स (४०) यांनी गोल केले.
संघातील वरिष्ठ आणि प्रमुख खेळाडूंना विश्रांती देणाºया भारतीय संघाचा हा स्पर्धेतील दुसरा पराभव आहे. सलामीच्या सामन्यात भारताला अर्जेंटिनाकडून २-३ असा पराभव पत्करावा लागला होता. तर इंग्लंडसोबत १ -१ अशी बरोबरी केली होती.
आॅस्टेÑलियाविरुद्धचा सामना भारतासाठी करा अथवा मरा असा होता. मात्र आॅस्ट्रेलियासमोर भारतीय संघाने लोटांगण घातले.
पहिल्या क्वार्टरमध्ये भारताने चेंडूवर अधिक निंयत्रण राखले. संघाला गोल करण्याच्या तीन संधी मिळाल्या मात्र त्याचा फायदा घेता आला नाही. दुसºया क्वार्टरमध्ये भारताला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला युवा ड्रॅग फ्लिकर वरुण कुमारचा शॉट क्रॉसबारला लागला.
आॅस्ट्रेलियाच्या स्ट्रायकरनी दुसºया क्वार्टरमध्ये काही चुका केल्या मात्र तिसºया क्वार्टरमध्ये त्यांनी एकही चुक केली नाही. क्रेगच्या पासवर जालेवस्कीने संघासाठी दुसरा गोल केला. त्यानंतर आॅस्ट्रेलियाने भारताला दबावात ठेवले.
भारताने अखेरच्या क्वार्टरमध्ये दोन गोल केले. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती. भारताने अखेरच्या क्षणी मिळालेला पेनल्टी कॉर्नर देखील वाया घालवला.
भारताचा चौथा सामना बुधवारी यजमान मलेशियासोबत होणार आहे. (वृत्तसंस्था)