आॅस्ट्रेलियाला पराभूत करीत भारताची जोहोर कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 02:13 AM2018-10-11T02:13:06+5:302018-10-11T02:13:26+5:30

भारतीय ज्युनियर पुरुष हॉकी संघाने बुधवारी विद्यमान विजेता आॅस्ट्रेलियाला ५-४ ने पराभूत करीत चौथा विजय मिळवला. सोबतच सुलतान जोहोर कप उपांत्य फेरीत आपली जागा नक्की केली.

 India defeated Australia in the semifinals of the Johor Cup tournament | आॅस्ट्रेलियाला पराभूत करीत भारताची जोहोर कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक

आॅस्ट्रेलियाला पराभूत करीत भारताची जोहोर कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक

googlenewsNext

जोहोर बारू (मलेशिया) : भारतीय ज्युनियर पुरुष हॉकी संघाने बुधवारी विद्यमान विजेता आॅस्ट्रेलियाला ५-४ ने पराभूत करीत चौथा विजय मिळवला. सोबतच सुलतान जोहोर कप उपांत्य फेरीत आपली जागा नक्की केली.
या विजयाने भारत साखळी फेरीतँक आघाडीवर राहिला. भारताने सामन्यात वर्चस्व राखले. सुरुवातीला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचा फायदा भारताला घेता आला नाही. मात्र गुरसाहिबजीत सिंगने पाचव्या मिनिटाला मैदानी गोल करत भारताला १ -० अशी आघाडी मिळवून दिली.
भारताने यात चांगली सुरुवात केली. त्यानंतर पुढेही दबदबा कायम ठेवला. ११ व्या, १४ व्या आणि १५ व्या मिनिटाला गोल करत ४ -० अशी आघाडी कायम ठेवली. हे गोल अनुक्रमे हसप्रीत सिंग, मनदीप मोर आणि विष्णुकांत सिंह यांनी केले. पहिल्या क्वार्टरमध्ये चार गोल केल्यावरही विद्यमान विजेत्या संघाला मोठा धक्का बसला.
भारतीय बचाव फळीने दुसऱ्या क्वार्टरमध्ये चांगला खेळ केला नाही. आॅस्ट्रेलियाच्या डॅमन स्टिफन्स याने १८ व्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोकवर गोल केला. त्यांच्याकडून होणारा हा पहिला गोल होता. डॅमन स्टिफन्स याने ३५ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर दुसरा गोल केला. त्यांनी लवकरच तिसरा गोलही केला.
शैलेंद्र लाकडा याने ४३ व्या मिनिटाला भारताची आघाडी ५-३ अशी केली. भारतीय संघावर अखेरच्या क्षणी गोल वाचवण्यासाठी मोठा दबाव होता. त्यातच ५९ व्या मिनिटाला आॅस्ट्रेलियाला पेनल्टी स्ट्रोक मिळाला. स्टिफन्स याने यावर गोल करण्यात कोणतीच चूक केली नाही. भारताने अखेरच्या क्षणी चांगला बचाव केला. आणि आॅस्ट्रेलियाला गोल करण्याची संधी दिली नाही. (वृत्तसंस्था)

आॅसीवर आणले दबाव
आक्रमकांनी शानदार खेळ करताना आॅस्टेÑलियाच्या बचावफळीवर सातत्याने दबाव आणले. त्याचवेळी भारताच्या बचावफळीने मोक्याच्यावेळी खेळ उंचावत आॅसी संघाला गोल करण्यापासून रोखले.

Web Title:  India defeated Australia in the semifinals of the Johor Cup tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Hockeyहॉकी