भारताने अमेरिकेचा पाडला फडशा, २२ गोलचा वर्षाव करत एकतर्फी विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 12:13 AM2017-10-26T00:13:24+5:302017-10-26T00:13:32+5:30

जोहोर बहरु (मलेशिया) : तुफान फॉर्ममध्ये असलेल्या युवा भारतीय हॉकी पुरुष संघाने सातव्या सुलतान जोहोर चषक स्पर्धेत तिसरा विजय मिळवताना अमेरिका संघाचा २२-० असा एकतर्फी फडशा पाडला.

India defeated United States of America, scoring 22 goals in one-way wins | भारताने अमेरिकेचा पाडला फडशा, २२ गोलचा वर्षाव करत एकतर्फी विजय

भारताने अमेरिकेचा पाडला फडशा, २२ गोलचा वर्षाव करत एकतर्फी विजय

googlenewsNext

जोहोर बहरु (मलेशिया) : तुफान फॉर्ममध्ये असलेल्या युवा भारतीय हॉकी पुरुष संघाने सातव्या सुलतान जोहोर चषक स्पर्धेत तिसरा विजय मिळवताना अमेरिका संघाचा २२-० असा एकतर्फी फडशा पाडला. अत्यंत एकतर्फी झालेल्या या सामन्यात भारतीय युवांच्या धडाक्यापुढे अमेरिकेचा सहज धुव्वा उडाला. विशेष म्हणजे भारताच्या गोलरक्षकाचा अपवाद सोडता सर्व खेळाडूंनी गोल करत उत्कृष्ट सांघिक खेळ करताना अमेरिकेला लोळवले.
तमान दया हॉकी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताने गोलचा वर्षाव करताना अमेरिकेला चांगलेच धुतले. स्पर्धेतील सलग तिसरा विजय नोंदवलेल्या भारताने याआधी रविवारी जपानला ३-२, तर यानंतर मलेशियाला २-१ असे नमवले. या दिमाखदार विजयानंतर भारताची गोलसरासरी अत्यंत मजबूत झाली असून गुणतालिकेत भारताने सर्वाधिक ९ गुणांसह अव्वल स्थानही मजबूत केले आहे. पहिल्याच क्वार्टरमध्ये चार गोल नोंदवत भारताने सामन्याचे चित्र स्पष्ट केले होते. यानंतर पुन्हा एकदा आपला धडाका कायम राखताना भारताने दुसºया क्वार्टरमध्येही ४ गोल करत ८-० अशी भक्कम आघाडी घेत अमेरिकेचे मानसिक खच्चीकरण केले. तिसºया क्वार्टरमध्ये मात्र भारतीय संघाने तुफान हल्ले करताना तब्बल ९ गोल नोंदवत अमेरिकेच्या अननुभवी युवा खेळाडूंना हॉकीचे धडेच दिले, तर चौथ्या आणि अखेरच्या क्वार्टरमध्ये भारताने ५ गोल नोंदवत दणदणीत विजयावर शिक्कामोर्तब केले.
>हरमनजित सिंग याने सर्वाधिक ५ गोल करताना सामन्यात छाप पाडली. त्याने २५व्या, २६व्या, ४०व्या, ४५व्या आणि ५२व्या मिनिटाला गोल केले. अभिषेकने (२८, ३७, ३८, ४५) चार गोल, विशाल अंतिल (२, ३०, ४४) आणि दिलप्रीत सिंगने (३, ५४, ५९) यांनी प्रत्येकी तीन गोल, तर मनिंदर सिंगने (४२, ४३) दोन गोल नोंदवले. त्याचप्रमाणे प्रताप लाक्रा (२), रविचंद्र मोइरंगथेम (७), रौशन कुमार (३७), शिलालंद लाक्रा (४७) आणि विवेक प्रसाद (४८) यांनीही वाहत्या गंगेत हात धुताना प्रत्येकी एक गोल करत अमेरिकेचा धुव्वा उडवला.

Web Title: India defeated United States of America, scoring 22 goals in one-way wins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Hockeyहॉकी