हॉकी क्रमवारीमध्ये भारत पाचव्या स्थानावर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 04:52 AM2018-07-18T04:52:09+5:302018-07-18T04:52:21+5:30

आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने आज जाहीर केलेल्या पुरुष हॉकी विश्व रँकिंगमध्ये भारताने एका स्थानाने झेप घेतली असून, ते पाचव्या स्थानावर पोहोचले आहेत.

India in fifth place in hockey rankings | हॉकी क्रमवारीमध्ये भारत पाचव्या स्थानावर

हॉकी क्रमवारीमध्ये भारत पाचव्या स्थानावर

Next

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने आज जाहीर केलेल्या पुरुष हॉकी विश्व रँकिंगमध्ये भारताने एका स्थानाने झेप घेतली असून, ते पाचव्या स्थानावर पोहोचले आहेत.
नेदरलँड्सच्या ब्रेडा येथे या महिन्यात झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत सलग दुसऱ्यांदा उपविजेतेपद पटकावल्यामुळे भारताला रँकिंगमध्ये फायदा झाला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीत मिळवलेल्या विजेतेपदाच्या जोरावर आॅस्ट्रेलियाचा संघ अव्वल स्थानावर कायम आहे. आॅस्ट्रेलियाने फायनलच्या शूटआऊटमध्ये भारताला पराभूत करीत १५ व्यांदा या चॅम्पियन्स ट्रॉफीत विजेतेपद पटकावले. आॅस्ट्रेलियाचे १,९०६ गुण झाले आहेत आणि दुसºया क्रमांकावर असणाºया अर्जेंटिनावर २३ गुणांची आघाडी घेतली आहे. अर्जेंटिनाचे १,८८३ गुण आहेत. बेल्जियम १,७0९ गुणांसह तिसºया, तर नेदरलँड्स १,६५४ गुणांसह चौथ्या स्थानी आहे. भारताचे १,४८४ गुण झाले असून, त्यांनी जर्मनीला मागे टाकले आहे. जर्मनीचे १,४५६ गुण आहेत. 

Web Title: India in fifth place in hockey rankings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Hockeyहॉकी