विकास दहियाकडे भारत ‘अ’चे नेतृत्व, एएचएल हॉकी : अमित रोहिदास उपकर्णधारपदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 03:48 AM2017-09-21T03:48:15+5:302017-09-21T03:48:17+5:30
आगामी २८ सप्टेंबरपासून पर्थ येथे सुरु होत असलेल्या आॅस्ट्रेलियाई हॉकी लीग (एएचएल) स्पर्धेसाठी गोलरक्षक विकास दहिया याच्याकडे भारत ‘अ’ पुरुष हॉकी संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.
नवी दिल्ली : आगामी २८ सप्टेंबरपासून पर्थ येथे सुरु होत असलेल्या आॅस्ट्रेलियाई हॉकी लीग (एएचएल) स्पर्धेसाठी गोलरक्षक विकास दहिया याच्याकडे भारत ‘अ’ पुरुष हॉकी संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. त्याचवेळी, बचावपटू अमित रोहिदास याची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.
भारताच्या ‘अ’ संघात गोलरक्षक कृष्ण बी. पाठक याच्यासह बचावफळीत नीलम संजीस जेस, गुरिंदर सिंग, आनंद लकडा, बलजित सिंग आणि विक्रमजीत सिंग यांचा समावेश आहे. हरजीत सिंग, आशिष कुमार टेपनो, हार्दिक सिंग, संता सिंग आणि नीलकांत शर्मा यांचा मध्यरक्षक म्हणून समावेश आहे. तसेच अरमान कुरैशी आक्रमक फळीचे नेतृत्व करणार असून त्याच्यासह मोहम्मद उमर, सिमरनजीत सिंग, अफ्फान युसूफ आणि तलविंदर सिंग यांचा समावेश आहे.
हे सलग दुसरे सत्रा आहे, ज्यात भारत आणि न्यूझीलंडचे संघ आॅस्टेÑलियाई लीगमध्ये सहभागी होतील. या स्पर्धेत एकूण १० संघांचा समावेश असून भारत ‘अ’ व्यतिरिक्त न्यूझीलंड, गतविजेता व्हिक्टोरिया, नॉर्दन टेरीटेरी, साऊथ आॅस्टेÑलिया, वेस्टर्न आॅस्टेÑलिया, न्यू साऊथ वेल्स, टास्मानिया, आॅस्टेÑलिया कॅपिटल टेरीटेरी आणि क्वीन्सलँड हे संघ जेतेपदासाठी लढतील. स्पर्धेच्या ‘ब’ गटात भारतीय संघाचा समावेश असून २९ सप्टेंबरला भारत ‘अ’ संघ वेस्टर्न आॅस्टेÑलियाविरुद्ध सलामीचा सामना खेळेल. (वृत्तसंस्था)