भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार, आशिया कप हॉकीत आज होणार लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 08:29 AM2017-10-15T08:29:58+5:302017-10-15T08:35:22+5:30

कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तानचे संघ आज पुन्हा आमने-सामने येणार आहेत. बांगलादेशच्या ढाका येथील मैदानात...

India-Pakistan will face again, Bangladesh will play in the match | भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार, आशिया कप हॉकीत आज होणार लढत

भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार, आशिया कप हॉकीत आज होणार लढत

Next

ढाका - कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तानचे संघ आज हॉकीच्या मैदानात भिडणार आहेत.  दोन सहज विजयानंतर आत्मविश्वास वाढलेल्या भारतीय हॉकी संघाचा सामना आशिया कपमध्ये रविवारी ढाका येथे पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत होणार आहे. संध्याकाळी 5 वाजता या सामन्याला सुरूवात होईल.

विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जाणा-या भारतीय संघाने पुल ए मध्ये बांगलादेश आणि जपानवर विजय मिळवला.
सुरुवातीच्या सामन्यात जापानला ५-१ असे पराभूत केल्यानंतर मनप्रीत सिंहच्या नेतृत्वात संघाने बांगलादेशला ७-० असे पराभूत केले. दुसरीकडे पाकिस्ताननेदेखील बांगलादेशला ७-०ला पराभूत केले. तर जपानने त्यांना २ -२ असे बरोबरीवर रोखले. भारत पुल एमध्ये सहा गुण घेऊन आघाडीवर आहे. तर पाकिस्तान चार गुणांसह दुस-या स्थानावर आहे.

भारत दोन विजयांसह सुपर चारमध्ये पोहचला आहे. मात्र संघ गटातील सर्व सामने जिंकून साखळी फेरीत अव्वल स्थानावर राहण्यास उत्सुक आहे.

पहिल्या दोन सामन्यात भारताने शानदार खेळ केला. आणि गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या. भारताने काही चांगले मैदानी गोलदेखील केले. मात्र पेनल्टी कॉर्नर ही चिंतेची बाब ठरली आहे. बांगलादेशविरोधात भारताने १३ पेनल्टी कॉर्नर मिळवले. मात्र त्यापैकी दोनवर गोल करण्यात संघाला यश आले. प्रशिक्षक रोलेंट ओल्टेमन्स यांना हटवल्यावर एक महिन्यात पदभार स्वीकारणाºया मारिन यांच्यासाठी आतापर्यंतचे हे सर्वात मोठे आव्हान असेल. 

Web Title: India-Pakistan will face again, Bangladesh will play in the match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.