भारताने नोंदवली विजयी हॅट्ट्रिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 04:18 AM2018-10-23T04:18:18+5:302018-10-23T04:18:31+5:30
भारतीय पुरुष हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत आशियाई सुवर्णपदक विजेत्या जपानचा ९-० ने धुव्वा उडवत विजयाची हॅट््ट्रिक नोंदवली.
मस्कट : भारतीय पुरुष हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत आशियाई सुवर्णपदक विजेत्या जपानचा ९-० ने धुव्वा उडवत विजयाची हॅट््ट्रिक नोंदवली.
रविवारी रात्री उशिरा झालेल्या या लढतीत भारताच्या सहा खेळाडूंनी गोल नोंदवले. भारत स्पर्धेत ९ गुणांसह अव्वल स्थानी असून मलेशिया ६ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे.
स्ट्रायकर ललित उपाध्याय व मनदीप सिंग यांनी प्रत्येकी २ गोल केले तर ड्रॅग फ्लिकर हरमनप्रीत सिंगने एक पेनल्टी स्ट्रोक व एक पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर केले. भारतातर्फे ललितने चौथ्या मिनिटाला पहिला व ४५ व्या मिनिटाला दुसरा गोल केला. हरमनप्रीतने १७ व्या मिनिटाला व २१ व्या मिनिटाला, तर मनदीप सिंग याने ४९ व ५७ व्या मिनिटाला गोल नोंदवले.
जपानचा गोलरक्षक ताकाशी योशिकावा आठव्या मिनिटाला हरमनप्रीतचा पेनल्टी कॉर्नरवरील फटका अडवण्याच्या प्रयत्नात दुखापतग्रस्त झाला. त्यावेळी गुरंजतने मिळालेल्या संधीवर गोल नोंदवला.