सुलतान जोहोर चषक हॉकी स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 03:24 AM2017-10-15T03:24:19+5:302017-10-15T03:24:31+5:30
मलेशियाच्या जोहर बाहरूमध्ये २२ आॅक्टोबरपासून सुरू होत असलेल्या सातव्या सुलतान जोहोर चषक हॉकी स्पर्धेसाठी भारताच्या १८ सदस्यांच्या संघाची निवड करण्यात आली.
नवी दिल्ली : मलेशियाच्या जोहर बाहरूमध्ये २२ आॅक्टोबरपासून सुरू होत असलेल्या सातव्या सुलतान जोहोर चषक हॉकी स्पर्धेसाठी भारताच्या १८ सदस्यांच्या संघाची निवड करण्यात आली. संघाचे नेतृत्व विवेक सागर प्रसाद करणार आहे, तर उपकर्णधार म्हणून प्रताप लाकडाची निवड करण्यात आली.
भारतीय संघाचा पहिला सामना जपानसोबत होईल. भारतीय संघ लखनऊच्या साई सेंटरमध्ये ११ सप्टेंबरपासून सराव करत आहे. भारतीय संघाचे प्रशिक्षक जुड फेलिक्स यांनी शिबिरात सर्व खेळाडूंच्या कौशल्याकडे लक्ष दिले. भारतीय संघ एका वर्षानंतर या स्पर्धेत सहभागी होत आहे. दोन वर्षांपूर्वी ब्रिटनकडून अंतिम सामन्यात पराभव स्वीकारल्यानंतर संघ दुसºया स्थानावर होता. फेलिक्स यांनी सांगितले की,‘ज्युनियर पुरुष संघ सुलतान जोहर चषकात चांगला खेळ करण्यासाठी मेहनत करत आहे. आमच्याकडे खेळाडूंचा मजबूत संघ आहे.त्यांना या स्पर्धेतून खूप काही शिकायला मिळेल.’ भारतासोबत जपान, यजमान मलेशिया, अमेरिका, आॅस्ट्रेलिया आणि ब्रिटनचे संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. (वृत्तसंस्था)
संघ - गोलकिपर - पंकज कुमार रजक, एस.अरासू शंकर, बचावफळी - सुमन बॅक, प्रताप लाकडा, सुखजीत सिंह, वरिंदर सिंह, मनदीप मोर, संजय, मिडफिल्डर - हरमनजीत सिंह, रविचंद्र सिंह, मोईरांगथेम, विवेक सागर प्रसाद, विशाल सिंह, विशाल अंतिल, फॉरवर्ड - शैलानंद लाकडा, रोशन कुमार, अभिषेक, दिलप्रीत सिंह, मनिंदर सिंह.