भारतीय हॉकी संघाचा धडाका; आॅस्ट्रेलिया ‘अ’वर पुन्हा विजय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 03:40 AM2019-05-11T03:40:30+5:302019-05-11T03:41:16+5:30
संघात पुनरागमन करणरा रुपिंदरपालसिंग याने भारताचे खाते उघडल्यानंतर युवा स्ट्रायकर सुमित कुमार ज्युनियर याने दोन गोल नोंदवला. यासह भारतीय पुरुष हॉकी संघाने आॅस्ट्रेलिया अ संघावर ३-० ने एकतर्फी विजय नोंदवला असून या दौऱ्यात भारताचा हा दुसरा विजय आहे.
पर्थ - संघात पुनरागमन करणरा रुपिंदरपालसिंग याने भारताचे खाते उघडल्यानंतर युवा स्ट्रायकर सुमित कुमार ज्युनियर याने दोन गोल नोंदवला. यासह भारतीय पुरुष हॉकी संघाने आॅस्ट्रेलिया अ संघावर ३-० ने एकतर्फी विजय नोंदवला असून या दौऱ्यात भारताचा हा दुसरा विजय आहे.
जखमी झाल्यानंतर आठ महिन्यांनी स्पर्धात्मक हॉकीत परतलेला ड्रॅक फ्लिकर रुपिंदरने सहाव्या मिनिटाला संघाचे खाते उघडले. यानंतर सुमितने १२ व्या तसेच १३ व्या मिनिटाला पाठोपाठ गोल नोंदविताच यजमान संघ बॅकफूटवर आला. भारतीय आक्रमक फळीने पहिल्या क्वार्टरमध्ये वर्चस्व गाजवून सातत्याने प्रतिस्पर्धी गोलफळीवर हल्ले चढविले. डावपेच फळाला आल्याने तिन्ही गोल पहिल्याच क्वार्टरमध्ये नोंदले गेले. पहिला शॉर्ट कॉर्नर मिळताच रुपिंदरने गोलकीपरला चकवून गोल केला.
बचावफळीतील हरमनप्रीतसिंगच्या उत्कृष्ट टॅकलिंगमुळे आॅस्ट्रेलिया संघाची चेंडूवरील पकड शिथिल झाली होती. त्याचा लाभ घेत सुमितने मनप्रीतसिंगच्या मदतीने दुसरा गोल नोंदविला. पुढच्या मिनिटाला आकाशदीपसिंग याने गोल नोंदविण्याची संधी निर्माण करताच, २१ वर्षांच्या सुमितने पुन्हा चेंडूला गोलजाळीची दिशा दाखविली.
पहिल्या क्वार्टरमध्ये ३-० ने आघाडी घेणाºया भारतीय संघाच्या आत्मविश्वासात भर पडलेली जाणवली. हरमनप्रीतने बचावाची बाजू भक्कमपणे सांभाळली. अनेकदा त्याने प्रतिस्पर्धी खेळाडूंकडून चेंडूवर नियंत्रण मिळविले होते. भारतीय संघ पुढील सामना सोमवारी खेळणार आहे. (वृत्तसंस्था)
‘पुढील सामना कठीण असेल. पण आम्ही सज्ज आहोत. आॅस्ट्रेलियाच्या राष्टÑीय संघातील सात खेळाडू अ संघात होते. तरीही आम्ही एकतर्फी विजय नोंदविल्याने आजच्या विजयामुळे आमचा आत्मविश्वास बळावला आहे. ही माझ्या मते चांगली प्रगती म्हणावी लागेल.’
- ग्रॅहम रीड, मुख्य प्रशिक्षक भारत.