भारतीय पुरूष हॉकी संघाचा मालिकेवर कब्जा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2018 06:39 PM2018-07-21T18:39:02+5:302018-07-21T18:39:20+5:30
भारतीय पुरूष हॉकी संघाने सातत्यपूर्ण कामगिरी करताना न्यूझीलंडला सलग दुस-या सामन्यात पराभवाची चव चाखवली.
बंगळुरू - भारतीय पुरूष हॉकी संघाने सातत्यपूर्ण कामगिरी करताना न्यूझीलंडला सलग दुस-या सामन्यात पराभवाची चव चाखवली. तीन सामन्यांच्या मालिकेतील दुस-या लढतीत भारताने 3-1 असा दणदणीत विजय मिळवला. रुपिंदर पाल ( 18 मि. ), एस व्ही सुनील ( 27 मि. ) आणि मनदीप सिंग ( 56 मि. ) यांनी प्रत्येकी एक गोल करून भारताला विजय मिळवून दिला. न्यूझीलंडकडून जीनसने 24 व्या मिनिटाला एकमेव गोल केला.
The Indian Men’s Hockey Team earned a convincing 3-1 victory over New Zealand in their second encounter of the three-match series played out in Bengaluru. Here is the result of the match on 21st July.#IndiaKaGamepic.twitter.com/2nKdBt62w0
— Hockey India (@TheHockeyIndia) July 21, 2018
पहिल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडला 4-2 असे नमवले होते. त्यात रुपिंदरसिंगने दोन गोल केले होते.