Youth Olympic Games: भारतीय पुरुष हॉकी संघासमोर बांगलादेशचे आव्हान, महिलांचा ऑस्ट्रियाशी सामना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2018 04:33 PM2018-09-08T16:33:53+5:302018-09-08T16:34:13+5:30
भारताच्या 18 वर्षांखालील पुरुष हॉकी संघाला युवा ऑलिम्पिक स्पर्धेत सलामीच्या लढतीत बांगलादेशचा सामना करावा लागणार आहे.
मुंबई - भारताच्या 18 वर्षांखालील पुरुष हॉकी संघाला युवा ऑलिम्पिक स्पर्धेत सलामीच्या लढतीत बांगलादेशचा सामना करावा लागणार आहे. अर्जेंटिना येथे होणाऱ्या या स्पर्धेत 7 ऑक्टोबर भारत-बांगलादेश सामना होईल, त्याच दिवशी महिलांचा संघ बलाढ्य ऑस्ट्रियाचा सामना करणार आहे. या स्पर्धेत प्रत्येकी पाच खेळाडूंचा समावेश असलेल्या संघांमध्ये हॉकी स्पर्धा खेळवण्यात येणार आहे.
The @FIH_Hockey announced the fixture for the hockey 5s 🏑 competition in our Youth Olympic Park. 🙌
— Buenos Aires 2018 (@BuenosAires2018) September 7, 2018
Find out more 👉 https://t.co/EGGBRib5gLpic.twitter.com/8YQLiuhxZu
भारतीय पुरुष संघाला 'ब' गटात स्थान देण्याक आले आहे. विवेक सागर प्रसाद भारतीत संघाचे नेतृत्व सांभाळणार आहे. भारताला ऑस्ट्रिया (8 ऑक्टोबर), केनिया ( 9 ऑक्टोबर), 2014च्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या ऑस्ट्रेलिया ( 10 ऑक्टोबर) आणि रौप्यपदक विजेत्या कॅनडा ( 11 ऑक्टोबर) यांचा सामना करावा लागणार आहे. 'अ' गटात अर्जेंटिना, मलेशिया, मेक्सिको, पोलंड, व्हॅनौट आणि झाम्बीया यांचा समावेश आहे.
Only 1 month to go until the hockey begins at the @BuenosAires2018@youtholympics! 📆😳 See the schedule that was revealed earlier today: https://t.co/fyxOBEfa7O#YOG2018pic.twitter.com/o5ULxgTEQy
— FIH (@FIH_Hockey) September 7, 2018
महिला गात भारतीय संघाचे नेतृत्व सलिमा तेटे करणार आहे. भारताला 'अ' गटात उरुग्वे ( 8 ऑक्टोबर), व्हॅनौट (9 ऑक्टोबर), अर्जेंटिना ( 10 ऑक्टोबर), अर्जेंटिना ( 10 ऑक्टोबर), दक्षिण आफ्रिका ( 11 ऑक्टोबर) यांचा सामना करावा लागेल. 'ब' गटात ऑस्ट्रेलिया, चीन, मेक्सिको, नामिबिया, पोलंड आणि झिम्बाब्वे यांचा समावेश आहे.