भारतीय महिला हॉकी संघ कोरियाच्या आव्हानास सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 12:09 AM2018-05-19T00:09:25+5:302018-05-19T00:09:25+5:30
भारतीय महिला हॉकी संघ आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अखेरच्या राऊंड रॉबिन सामन्यात आज शनिवारी यजमान द. कोरियाविरुद्ध कडवी लढत देणार आहे.
डोंघाय सिटी(द. कोरिया): भारतीय महिला हॉकी संघ आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अखेरच्या राऊंड रॉबिन सामन्यात आज शनिवारी यजमान द. कोरियाविरुद्ध कडवी लढत देणार आहे. सुनीता लाक्राच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ स्पर्धेत अद्याप अपराजित आहे. जपानवर ४-१, चीनवर ३-१ आणि काल मलेशियावर ३-२ असा विजय नोंदविला होता.
आता जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेल्या कोरियाविरुद्ध लढत होणार असून प्रतिस्पर्धी संघाला त्यांच्या घरी मात देणे आव्हानात्मक असेल. या सामन्यानंतर रविवारी दक्षिण कोरियाविरुद्ध अंतिम सामना खेळायचा आहे. या सामन्यातून संघाला या अंतिम सामन्याची तयारी करण्याची मोठी संधी मिळेल. कोरियाने मलेशिया आणि चीनवर विजय नोंदविला तर जपानविरुद्धची लढत १-१ अशी बरोबरीत राहिली होती. (वृत्तसंस्था)
>कोरिया संघ बलाढ्य आहे पण आमच्या मुली सातत्यपूर्ण खेळ करीत आहेत. मैदान कुठलेही असो, आमचे लक्ष केवळ खेळावर असेल. कोरियाची बचावफळी अत्यंत भक्कम असल्यामुळे आम्हाला अचूक खेळ करावा लागणार आहे. फायनलआधी आम्ही कसे खेळतो हे सामन्यातून कळून येईल. थकवा टाळून स्मार्ट हॉकी खेळण्याची कमाल करावी लागणार आहे.
- शोर्ड मारिन
मुख्य प्रशिक्षक