भारतीय महिला संघ हरूनही जिंकला, टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2019 10:09 PM2019-11-02T22:09:59+5:302019-11-02T22:10:34+5:30
भारतीय महिला संघाने भुवनेश्वर येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत आज इतिहास रचला.
भुवनेश्वर - भारतीय महिला संघाने भुवनेश्वर येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत आज इतिहास रचला. आज अमेरिकेविरुद्धच्या लढतीत भारताला पराभव पत्करावा लागला. मात्र सरस गोलफरकाच्या आधारावर भारतीय महिला संघ अमेरिकेवर मात करत टोकिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे.
पात्रता स्पर्धेत झालेल्या पहिल्या लढतीत भारताने अमेरिकेला 5-1 अशा मोठ्या फरकाने पराभूत केले होते. मात्र परतीच्या लढतीत भारताला 1-4 असा पराभव पत्करावा लागला. मात्र सरस गोलफरकाच्या जोरावर भारताने 6-5 अशा फरकाने अमेरिकेला मागे टाकत टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले.
ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याची भारतीय महिला संघाची ही तिसरी वेळी आहे. तसेच सलग दुसऱ्यांदा भारतीय महिला संघ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. भारतीय महिला संघ 2016 मध्ये 36 वर्षांनंतर रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला होता. त्यानंतर आता भारतीय महिला संघाने टोकिओ ऑलिम्पिकसाठी पात्रा मिळवली आहे.