बलाढ्य आॅस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा निसटता पराभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 05:27 AM2017-10-27T05:27:36+5:302017-10-27T05:27:45+5:30
जोहार बारू : भारतीय ज्युनियर हॉकी संघ सातव्या सुलतान जोहोर कप हॉकी स्पर्धेच्या चौथ्या साखळी सामन्यात गुरुवारी आॅस्ट्रेलियाकडून ३-४ ने पराभूत झाला.
जोहार बारू : भारतीय ज्युनियर हॉकी संघ सातव्या सुलतान जोहोर कप हॉकी स्पर्धेच्या चौथ्या साखळी सामन्यात गुरुवारी आॅस्ट्रेलियाकडून ३-४ ने पराभूत झाला. भारताने काल तिस-या सामन्यात अमेरिकेवर २२-० ने धडाकेबाज विजय नोंदविला होता.
दिलप्रीतसिंगने ३०व्या आणि ४७व्या मिनिटांना तसेच त्याआधी संजयने नवव्या मिनिटाला गोल केला. आॅस्ट्रेलियाकडून तिस-या, ३६व्या, ४४ आणि ४५व्या मिनिटांना गोल करण्यात आले. आॅस्ट्रेलियाने पहिल्या क्वार्टरमध्ये भारतीय बचाव फळीला दडपणात आणून तिसºयाच मिनिटाला खाते उघडले. यानंतर भारताने नवव्या मिनिटाला गोल नोंदवून बरोबरी साधली.
दुसºया क्वार्टरमध्ये भारताने गोल नोंदविताच आॅस्ट्रेलियावर २-१ अशी आघाडी झाली होती. मात्र ही आघाडी टिकविण्यात भारताला अपयश आले. यावेळी, दुसºया क्वार्टरच्या अखेरपर्यंत भारताने ही आघाडी कायम राखत नियंत्रण राखले खरे, परंतु नंतर आॅस्टेÑलियाने वेगवान खेळ करत सामन्याचे चित्र पालटले. तिसºया क्वार्टरमध्ये आॅस्टेÑलिया संघाने आपला हिसका दाखवताना दोन पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करून ३-२ने आघाडी घेतली.
चौथ्या क्वार्टरमध्ये दलप्रीतने गोल नोंदविताच सामना बरोबरीत आला होता; पण ४९व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करताच आॅस्ट्रेलियाने
सामना जिंकला. भारताला २८ आॅक्टोबर रोजी ब्रिटनविरुद्ध खेळायचे आहे. (वृत्तसंस्था)