ज्यु. हॉकी शिबिरासाठी ३३ खेळाडूंची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 03:20 AM2017-11-13T03:20:45+5:302017-11-13T03:23:07+5:30
बंगळूरुमध्ये आजपासून सुरु होणार्या ज्युनियर पुरूष हॉकी राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरासाठी ३३ खेळाडूंची घोषणा करण्यात आली. हे सर्व खेळाडू २३ डिसेंबरपर्यंत प्रशिक्षक ज्यूड फेलिक्स यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतील.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : बंगळूरुमध्ये आजपासून सुरु होणार्या ज्युनियर पुरूष हॉकी राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरासाठी ३३ खेळाडूंची घोषणा करण्यात आली. हे सर्व खेळाडू २३ डिसेंबरपर्यंत प्रशिक्षक ज्यूड फेलिक्स यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतील.
या शिबिरात नुकत्याच मलेशियात झालेल्या सुलतान जोहोर कप स्पर्धेत कास्यंपदक पटकावेल्या संघातील १८ सदस्यांचाही समावेश आहे. मनदीप मोर, प्रताप लाकडा, पंकज रजक, हरमनजीत सिंग, विशाल सिंग, रोशनकुमार, दिलप्रित सिंग, मनिंदर सिंग, संजय, सेंथामिज, शंकर, अभिषेक, विशाल अंतिल, वरिं ंदर सिंग, विवेक प्रसाद, सुमन बेक, सुखजीत सिंग, रबिचंद्र मोइरंग्थेम व शिलानंद लाकडा यांचा या संघात समावेश होता. फेलिक्स म्हणाले,‘ भारतीय ज्युनियर संघातील हे खेळाडू प्रथमच मलेशियात एकत्र खेळले. त्यांनी चांगली कामगिरी केली. या ३३ खेळाडूंमध्ये चांगली गुणवत्ता आहे.
निवड झालेले खेळाडू असे
गोलरक्षक: पंकज कुमार रजक, तनुज गुलिया, प्रशांत कुमार चौहान, एएस सेंयामिज अरासु. बचावफळी: सुमन बेक, हरमनजीत सिंग, मनदीप मोर, मोहम्मद फराज, प्रिन्स प्रताप लाकडा. मधली फळी: वरिं ंदर सिंग, सनी मलिक, विशाल अंतिल, यशदीप सिवाच, विशाल सिंग, विवेक सागर प्रसाद,अक्षय अवस्थी, सुखजीत सिंग, रबिचंद्र सिंग, दीनाचंद्र माईरंग्थेम. आघाडीपटू: शिलानंद लाकडा, जयप्रकाश पटेल, दिलप्रीत सिंग, मोहम्मद सैफ, रोशन कुमार, अभिषेक, शिवम आनंद, राहुलकुमार राजभर, मोहम्मद अलिशान, संजय, मनिंदर सिंग, राहुल, आनंदकुमार बारा.