जाणून घ्या हॉकीच्या जादुगाराबाबतच्या काही खास गोष्टी
By सुमेध उघडे | Published: August 29, 2017 01:39 PM2017-08-29T13:39:35+5:302017-08-29T13:43:53+5:30
29 ऑगस्ट हा मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस भारतात ' क्रीडा दिवस' म्हणून साजरा करण्यात येतो. जागतिक क्रीडा इतिहासात फुटबॉलमध्ये पेले, क्रिकेट मधील डॉन ब्रॅडमन तर हॉकीमध्ये ध्यानचंद यांना आजही सर्वोत्तम म्हणून गणण्यात येते.
औरंगाबाद, दि. 29 : 29 ऑगस्ट हा मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस भारतात ' क्रीडा दिवस' म्हणून साजरा करण्यात येतो. जागतिक क्रीडा इतिहासात फुटबॉलमध्ये पेले, क्रिकेट मधील डॉन ब्रॅडमन तर हॉकीमध्ये ध्यानचंद यांना आजही सर्वोत्तम म्हणून गणण्यात येते. जाणून घेऊ त्यांच्याबद्दल काही महत्वाच्या गोष्टी.
- ध्यानचंद यांनी वयाच्या 16 वर्षी भारतीय सेनेत प्रवेश केला. पुढे ते 'मेजर' या पदापर्यंत पोहचून वयाच्या 56 व्या वर्षी निवृत्त झाले.
- ध्यानचंद यांनी 1928 च्या एम्सटरड्रम ऑलिंपिकमध्ये सर्वाधिक 14 गोल केले.
- संपूर्ण कारकिर्दीत ध्यानचंद यांनी 4०० पेक्षाजास्त गोल केले.
- 1932 च्या ऑलिंपिकमधील हॉकीच्या अंतिम सामन्यात भारताने अमेरिकेस 24-1 अशा फरकाने हरवले. यातील 8 गोल ध्यानचंद यांनी तर 1० गोल त्यांचे भाऊ रूपसिंह यांनी केले.
- नेदरलंड च्या अधिका-यांनी ध्यानचंद यांच्या हॉकी स्टिकमध्ये चुंबकासारखी काही वस्तु तर नाही न याचा शोध घेण्यासाठी तिला तोडले.
- 1936 च्या ऑलिंपिकमध्ये ध्यानचंद यांनी भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व केले. यात अंतिम सामन्यात त्यांनी जर्मनी विरुध्द 6 गोल करत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले.
- 1928, 1932 व 1936 अशा सलग तीन ऑलिंपिकमध्ये त्यांनी भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले.
- ध्यानचंद को 1956 में भारत सरकार द्वारा पद्म विभूषण से सम्मानित किया गया.
- ध्यानचंद यांना १९५६ मध्ये भारत सरकारने पद्य विभूषण पुरस्कार देऊन सन्मानीत केले.
- जपानचे नागरिक ध्यानचंद यांच्या खेळाचे फार मोठे चाहते. ध्यानचंद यांच्या जादुई खेळाचा सन्मान करताना त्यांनी वियना येथील क्रीडा संस्थेत त्यांचा एक पुतळा उभारला आहे. त्यास 4 हातात 4 हॉकी स्टिक दाखवून त्यांनी ध्यानचंद यांच्या खेळातील जादू दाखवली आहे.
- 3 डिसेंबर 1979 ला पहाटे नवी दिल्लीत मेजर ध्यानचंद यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा अंतिम संस्कार झाशी येथे ते ज्या मैदानावर हॉकीचा सराव करत तेथे करण्यात आला.
- ध्यानचंद यांनी 'गोल' या नावाने त्यांचे आत्मचरित्र सुद्धा लिहिले आहे. त्यात ते म्हणतात, " आपल्या सर्वाना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे मी खूप साधारण मनुष्य आहे."