माझी सर्वोत्तम कामगिरी अद्याप शिल्लक- सविता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 02:21 AM2020-06-17T02:21:20+5:302020-06-17T02:21:25+5:30
रिओ ऑलिम्पिकचे दु:खद स्वप्न विसरण्यास प्रयत्नशील
बेंगळुरू : माझी सर्वोत्तम कामगिरी अद्याप शिल्लक असून रिओ आॅलिम्पिकचे अपयश विसरून आमचा संघ टोकियो आॅलिम्पिकमध्ये इतिहास घडविण्यास प्रयत्नशील आहे, असे मत भारतीय महिला हॉकी संघाची गोलकिपर सविताने व्यक्त केले.
भारतीय महिला हॉकी संघाने ३६ वर्षांनंतर रिओ आॅलिम्पिक २०१६ साठी पात्रता मिळवली होती, पण संघाला साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला.
भारतीय संघ एफआयएच विश्व मानांकनामध्ये नवव्या स्थानी आहे. गेल्या १२ वर्षांत भारतीय संघाची अविभाज्य घटक असलेली सविता म्हणाली, कारकिर्दीच्या सुरुवातीला माझ्यात एवढा आत्मविश्वास नव्हता.
सुरुवातीला अन्य खेळाडूंच्या तुलनेत माझा आत्मविश्वास ढासळलेला होता. खेळाबाबतही पॅशन नव्हती. वेळेनुसार खेळाप्रती माझे प्रेम वाढले आणि माझ्या मते माझी सर्वोत्तम कामगिरी अद्याप शिल्लक आहे.’(वृत्तसंस्था)
‘माझी सर्वोत्तम कामगिरी अद्याप शिल्लक आहे. रिओ आॅलिम्पिकचे अपयश विसरण्यासाठी मी टोकियो आॅलिम्पिकमध्ये आपल्या संघातर्फे सर्वोत्तम कामगिरी करण्यास उत्सुक आहे. त्यावेळी आम्ही नवख्या होतो आणि आमच्याकडून चुका झाल्या. पण, टोकियोमध्ये २०२१ मध्ये आमच्याकडे इतिहास नोंदविण्याची संधी आहे.’