नरिंदर बत्रा अध्यक्ष, राजीव मेहता महासचिव; आयओए निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 12:04 AM2017-12-15T00:04:13+5:302017-12-15T00:04:21+5:30
आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांची भारतीय आॅलिम्पिक संघटनेच्या (आयओए)अध्यक्षपदी गुरुवारी निर्विरोध निवड झाली. राजीव मेहता हे देखील पुढील चार वर्षांच्या दुस-या कार्यकाळासाठी महासचिवपदी निर्वाचित झाले आहेत.
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांची भारतीय आॅलिम्पिक संघटनेच्या (आयओए)अध्यक्षपदी गुरुवारी निर्विरोध निवड झाली. राजीव मेहता हे देखील पुढील चार वर्षांच्या दुस-या कार्यकाळासाठी महासचिवपदी निर्वाचित झाले आहेत.
अध्यक्षपदाच्या शर्यतीत बत्रा यांना १४२ तर खन्ना यांना १३ मते मिळाली. आनंदेश्वर पांडे कोषाध्यक्ष आणि आर. के. आनंद हे वरिष्ठ उपाध्यक्षपदी निवडून आले. आनंद यांनी जनार्दनसिंग गहलोत यांचा ९६ विरुद्ध ३५ अशा मतफरकाने पराभव केला. ५९ वर्षांचे बत्रा हे आंतरराष्ट्रीय क्रीडा महासंघाचे प्रमुख असताना राष्ट्रीय आॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष बनलेल्या निवडक व्यक्तींमध्ये सहभागी झाले आहेत. आशियाई टेनिस महासंघाचे अध्यक्ष अनिल खन्ना यांनी मागील आठवड्यात रिंगणातून माघार घेताच बत्रा यांची निवड औपचारिकता ठरली. भारतीय भारोत्तोलन संघटनेचे अध्यक्ष वीरेंद्र वैश्य हेही अध्यक्षपदाच्या शर्यतीत होते, पण नंतर निवडणुकीतून माघार घेतली. निवडणुकीवर अनिश्चिततेचे सावट मात्र कायम आहे. क्रीडाप्रेमी अॅड. राहुल मेहरा यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेत आयओएच्या निवडणुकीत क्रीडासंहितेचे उल्लंघन होत असल्याची तक्रार केली होती. (वृत्तसंस्था)