कभी रुकना नही, चलतेही रहना : हेलन मेरी इनोसंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 11:41 PM2018-02-24T23:41:25+5:302018-02-24T23:41:25+5:30

खेळात करियर करणे सोपे नाही. सर्वच खेळाडू सुरुवातीपासून सेलीब्रिटी नसतात तर ते सराव आणि मेहनतीने यश मिळवत सेलीब्रिटी बनतात, असे प्रतिपादन अर्जून पुरस्कार विजेत्या गोलरक्षक हॉकीपटू हेलन मेरी इनोसंट यांनी शनिवारी येथे केले. एका महाविद्यालयातील कार्यक्रमानिमित्त त्या जळगावात आल्या असताना ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला.

Never stop, stay moving: Helen Mary Innocent | कभी रुकना नही, चलतेही रहना : हेलन मेरी इनोसंट

कभी रुकना नही, चलतेही रहना : हेलन मेरी इनोसंट

Next

- ललित झांबरे

जळगाव : खेळात करियर करणे सोपे नाही. सर्वच खेळाडू सुरुवातीपासून सेलीब्रिटी नसतात तर ते सराव आणि मेहनतीने यश मिळवत सेलीब्रिटी बनतात, असे प्रतिपादन अर्जून पुरस्कार विजेत्या गोलरक्षक हॉकीपटू हेलन मेरी इनोसंट यांनी शनिवारी येथे केले. एका महाविद्यालयातील कार्यक्रमानिमित्त त्या जळगावात आल्या असताना ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला.
त्या म्हणाल्या, खेळ आणि शिक्षण सोबत चालले पाहीजे तरच भवितव्य उज्ज्वल असते आणि कितीही अडचणी आल्या तरी खेळाडूला थांबून चालत नाही. कभी रुकना नही, चलतेही रहना असा मंत्र त्यांनी दिला.
२००६ मध्ये आपण निवृत्ती पत्करल्यानंतर गेल्या १०-१२ वर्षात भारतीय हॉकीत विशेषत: महिला हॉकीत बरेच सकारात्मक बदल घडून आले आहेत. या काळात आपण क्रमवारीत १३वरून १० व्या स्थानापर्यंत प्रगती केली. अधिकाधिक स्पर्र्धात आपले संघ हल्ली खेळत असतात आणि हॉकीच्या प्रत्येक क्षेत्रात व्यावसायिक प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध झाल्याने तंत्र आणि कौशल्यातसुद्धा सुधारणा झाली आहे.
आता टेलिव्हीजन आणि इंटरनेटमुळे प्रत्येक स्पर्धा आणि प्रत्येक खेळाडूचा खेळ बारकाईने अभ्यासता येतो आणि त्यानुसार डावपेच आखून तयारी करता येते. या शिवाय हॉकी इंडियाच्या निर्मितीने भारतात महिला हॉकीला चांगले दिवस आले असल्याचे त्या म्हणाल्या.
हॉकी इंडिया झाल्यामुळेच २०१२ पासून आतापर्यंत आपण साधारण दीडशे सामने खेळू शकलो हे त्यांनी नमूद केले.
भारतीय हॉकीच्या सुवर्णयुगाचे (२००२ ते २००४) आपण भागीदार असल्याचा अभिमान असल्याचे सांगत त्या म्हणाल्या की, २००२ चे राष्टÑकुल सामने, २००३चे आफ्रो-अशियाई सामने आणि २००४चा अशिया कप या सुवर्णविजेत्या संघात आपण गोलरक्षक होतो मात्र या पैकी
कोणता एक विजय अधिक महत्वाचा असे नाही तर प्रत्येकच विजय माझ्यासाठी महत्वाचा होता. भारतासाठी त्या-त्या दिवशी आपण सर्वाेत्तम योगदान देऊ शकलो याचा आनंद व अभिमान अजूनही आहे. एक स्पर्धा संपली की दुसरी आणि नवीन आव्हान असा विचार करून आपण खेळत आलो.

प्रशिक्षकांच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी संघाचा मुख्य प्रशिक्षक भारतीयच असावा आणि त्याच्यासोबत परदेशी प्रशिक्षक असावेत असे मत ठासून मांडले. भारतीय प्रशिक्षक असला तर त्याला खेळाडूंच्या सामाजिक, आर्थिकस्तराची जाणिव असते आणि खेळाडूंच्या राहणीमान व आहाराची सुद्धा कल्पना असते. ही माहिती खेळाडूंच्या प्रशिक्षणात फार महत्त्वाची ठरते. कौशल्य विकासाबाबत परदेशी प्रशिक्षकांची चांगली मदत होऊ शकते. अलिकडे सातत्याने होत असलेल्या सामन्यांमुळे प्रत्येक खेळाडूची जवळून माहिती मिळत असल्याने मॅन टू मॅन डावपेच आखून तयारी करून घेता येते असे त्या म्हणाल्या.

Web Title: Never stop, stay moving: Helen Mary Innocent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Hockeyहॉकी