नातं सीमेपलीकडचं... हृदयविकाराशी लढणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूला भारताकडून हवाय मदतीचा हात!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2018 02:48 PM2018-04-24T14:48:50+5:302018-04-24T14:48:50+5:30

हॉकी विश्वचषक विजेत्या पाकिस्तानी संघात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या मन्सूर अहमदला उपचारासाठी भारतात यायचे आहे.

Pakistan hockey hero seeks heart transplant in India | नातं सीमेपलीकडचं... हृदयविकाराशी लढणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूला भारताकडून हवाय मदतीचा हात!

नातं सीमेपलीकडचं... हृदयविकाराशी लढणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूला भारताकडून हवाय मदतीचा हात!

Next

कराची - पाकिस्तानचा दिग्गज माजी हॉकीपट्टू मन्सूर अहमद सध्या हृदयरोगाने त्रस्त आहे. त्यामुळे मन्सूर अहमद यांनी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी भारत सरकार आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे विनवणी केली आहे. 1990 मध्ये पाकिस्तानी संघाचे कर्णधारपद संभाळणाऱ्या मन्सूर अहमद यांना हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी भारतात यायचे आहे. यासाठी त्यांनी व्हिडिओद्वारे व्हिसाची मागणी केली. 

हॉकी विश्वचषक विजेत्या पाकिस्तानी संघात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या मन्सूर अहमदला पेसमेकर आणि स्टेंटच्या समस्या वाढल्याने हृदय प्रत्यारोपण करण्याशिवाय पर्याय नाही. हृदय प्रत्यारोपण करण्यासाठी त्यांना भारतात यायचे आहे. सध्याची भारत आणि पाकिस्तानची राजकिय परिस्थिती पाहता सुषमा स्वराज त्याना व्हिसा देणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे. 



 



 

Web Title: Pakistan hockey hero seeks heart transplant in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.