बचावफळी भक्कम करण्यास प्राधान्य, रूपिंदरपाल सिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 01:17 AM2017-11-30T01:17:37+5:302017-11-30T01:17:55+5:30
उजव्या पायाच्या सांध्याला दुखापत झाल्याने सहा महिने बाहेर राहिलेला ड्रॅगफ्लिकर रुपिंदरपाल सिंग राष्ट्रीय हॉकी संघात परतला आहे. येत्या १ डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या विश्व हॉकी लीग फायनलमध्ये संघाची बचावफळी भक्कम करण्यास आपले प्राधान्य असल्याचे रुपिंदरने सांगितले.
भुवनेश्वर : उजव्या पायाच्या सांध्याला दुखापत झाल्याने सहा महिने बाहेर राहिलेला ड्रॅगफ्लिकर रुपिंदरपाल सिंग राष्ट्रीय हॉकी संघात परतला आहे. येत्या १ डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या विश्व हॉकी लीग फायनलमध्ये संघाची बचावफळी भक्कम करण्यास आपले प्राधान्य असल्याचे रुपिंदरने सांगितले.
‘माझ्यासाठी ही नवी सुरुवात असेल. अनेक महिन्यांनंतर मैदानावर परतलो आहे. सहकाºयांमध्ये ऊर्जा निर्माण करण्यास प्राधान्य असेल,’ असे रुपिंदरने सांगितले.
पहिल्या सराव सामन्यात आॅलिम्पिक चॅम्पियन अर्जेंटिनाविरुद्ध रुपिंदरने पेनल्टी कॉर्नरवर दोन
आणि पेनल्टी स्ट्रोकवर एक गोल नोंदविला. सामन्यानंतर तो म्हणाला, ‘या दरम्यान मी अनेक नव्या बाबी आत्मसात केल्या. सामन्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला.
यामुळे नवी ऊर्जा मिळाली आहे. बचावफळी भक्कम केल्यास आम्हाला प्रतिस्पर्धी संघांविरुद्ध अधिक पेनल्टी कॉर्नर्सची संधी मिळू शकेल. बचावफळी देखील विजय मिळवून देऊ शकते. आम्ही केवळ सामना वाचवितो असे नव्हे. गोलची संधी
व्यर्थ जाऊ नये, यावर आम्ही फोकस करणार आहोत. शारीरिक आणि मानसिकरीत्या स्पर्धात्मकतेचा
संचार झाल्यास विजय मिळविणे सोपे होते.’ (वृत्तसंस्था)