कोरिया दौऱ्यासाठी राणी रामपालकडे महिला हॉकी संघाचे नेतृत्व
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 03:24 AM2019-05-11T03:24:29+5:302019-05-11T03:25:35+5:30
हॉकी इंडियाने २० मेपासून सुरू होणाºया कोरिया दौºयातील तीन सामन्यांच्या मालिकेसाठी स्ट्रायकर राणी रामपाल हिच्याकडे महिला हॉकी संघाचे नेतृत्व सोपविले आहे.
नवी दिल्ली : हॉकी इंडियाने २० मेपासून सुरू होणाºया कोरिया दौºयातील तीन सामन्यांच्या मालिकेसाठी स्ट्रायकर राणी रामपाल हिच्याकडे महिला हॉकी संघाचे नेतृत्व सोपविले आहे.
मुख्य प्रशिक्षक सोर्ड मारिन यांच्या मार्गदर्शनात खेळणाºया या संघाची उपकर्णधार गोलकीपर सविता असेल. राणी जखमी असल्यामुळे आधीच्या मलेशिया दौºयात खेळू शकली नव्हती. तीन सामन्यांची मालिका जपानच्या हिरोशिमा शहरात १५ ते २३ जूनदरम्यान आयोजित एफआयएच महिला सिरिज फायनल्सच्या तयारीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला भारतीय संघाने स्पेन आणि आयर्लंडचा दौरा केला होता. या दौºयात भारताने दोन सामने जिंकले, तीन अनिर्णीत राहिले तर एका सामन्यात संघ पराभूत झाला होता. मलेशिया दौºयात मात्र भारतीय संघाने ४-० ने क्लीन स्वीप केले. सविता आणि रजनी इतिमारपू यांच्याकडे तीन सामन्यांसाठी गोलकीपरची जबाबदारी असेल. मलेशिया दौºयात नसलेली गुरजित कौर ही देखील संघात परतली आहे. प्रशिक्षक मारिन म्हणाले, ‘मी राणी आणि गुरजितसारख्या अनुभवी खेळाडूंच्या पुनरागमनावर आनंदी आहे. सामने खेळण्यास दोघीही पूर्णपणे फिट असल्याचे ऐकून बरे वाटले. हा दौरा एफआयएच फायनलपूर्वी उपयुक्त ठरणार आहे. (वृत्तसंस्था)
भारतीय महिला हॉकी संघ
गोलकीपर : सविता, रजनी इतिमारपू. बचाव फळी : सलीमा टेटे, सुनीता लाक्रा, दीप ग्रेस एक्का, करिश्मा यादव, गुरजित कौर, सुशीला चानू पुखराम्बाम
मधली फळी : मोनिका, नवज्योत कौर, निक्की प्रधान, नेहा गोयल, लिलिमा मिंझ.
आक्रमक फळी : राणी रामपाल (कप्तान), वंदना कटारिया, लालरेमसियामी, ज्योती आणि नवनीत कौर.