युवा आॅलिम्पिक शिबिरासाठी हॉकीपटूंची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 02:14 AM2018-03-07T02:14:09+5:302018-03-07T02:14:09+5:30
हॉकी इंडियाने युवा आॅलिम्पिकसाठी पात्रता फेरीच्या तयारीसाठी होणा-या शिबिरासाठी पुरुष व महिला हॉकीपटूंची घोषणा केली आहे. प्रत्येकी २५ खेळाडूंची यादी जाहरी केली असून पात्रता फेरी २५ ते २९ एप्रिल दरम्यान बॅँकॉक येथे होणार आहे.
आग्रा - हॉकी इंडियाने युवा आॅलिम्पिकसाठी पात्रता फेरीच्या तयारीसाठी होणा-या शिबिरासाठी पुरुष व महिला हॉकीपटूंची घोषणा केली आहे. प्रत्येकी २५ खेळाडूंची यादी जाहरी केली असून पात्रता फेरी २५ ते २९ एप्रिल दरम्यान बॅँकॉक येथे होणार आहे.
निवड करण्यात आलेले खेळाडू सात दिवस प्रशिक्षण घेणार असून यात तंदुरुस्ती, गती, तंत्र यावर भर दिला जाणार आहे. यातूनच खेळाडूंची निवड केली जाणार आहे. युवा आॅलिंम्पिक आॅक्टोबर २०१८ मध्ये ब्यूनोस आयर्स मध्ये रंगेल.
युवा पुरुष संघ :
गोलरक्षक : सव्यसाची मिज, तनुज गुलिया, प्रशांतकुमार चौहान. बचाव फळी: सुखजीत सिंग, दिनाचंद्र सिंग मोईरांगथेम, अक्षय अवस्थी, संजय. मधली फळी: रबिचंद्र सिंग मोईरांगथेम, यशदीप सिवाच, मनिंदर सिंग, निरजकुमार वारिबाम, भरत ठाकूर. आघाडीपटू: सन्नी मलिक, जयप्रकाश पटेल, मोहम्मद सैफ खान, मोहम्मद अलिशान, शिवम आनंद, राहुल कुमार राजभार,
सुदीप चिरमाको, सिमरनजोत सिंग.
युवा महिला संघ :
गोलरक्षक: बी. देवी खरीबाम, खुशबू. बचाव फळी: प्रियंका, सलीमा टेटे, इशिका चौधरी, निलम. मधली फळी: बलजीत कौर, जीनव किशोरी टोप्पो, चेतना राठी, प्रिती मिताली, फिलिसिया टोप्पो. आघाडीपटू: संगिताकुमारी, दीपिका सोरेंग, मुमताच खान, लाल रिडिकी, रीत, दीपिका, ऋतुजा पिसाळ, रोजिता कुजुर.