भारताच्या दोन्ही संघांचे रौप्यवर समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 05:19 AM2018-10-16T05:19:12+5:302018-10-16T05:19:19+5:30
ब्युनासआयर्स : भारताच्या दोन्ही संघांना युवा आॅलिम्पिकमधील हॉकी फाईव्ह प्रकारात रौप्यावर समाधान मानावे लागले. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात पुरुष ...
ब्युनासआयर्स : भारताच्या दोन्ही संघांना युवा आॅलिम्पिकमधील हॉकी फाईव्ह प्रकारात रौप्यावर समाधान मानावे लागले. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात पुरुष संघ मलेशियाकडून २-४ ने पराभूत झाला. महिला संघाचा यजमान अर्जेंटिनाकडून १-३ ने पराभव झाला. अर्जेंटिनाच्या पुरुष व चीनच्या महिला संघाला कांस्यवर समाधान मानावे लागले.
सुवर्ण पदकाच्या अंतिम सामन्यात भारताकडून विवेक सागर प्रसाद याने दुसऱ्याच मिनिटाला गोल नोंदवित आघाडी मिळवून दिली होती, पण मलेशियाकडून दोन मिनिटानंतर फिरदोस रौस्दी याने गोल नोंदविताच बरोबरी झाली. प्रसादने पाचव्या मिनिटाला दुसरा गोल करीत भारताला पुन्हा आघाडी मिळवून दिली.
मध्यंतरानंतर मलेशियाने मुसंडी मारली. अकीमुल्ला अन्वरने १३ व्या मिनिटाला बरोबरी साधून दिली. तीन मिनिटांनी अमीरुल अझहरने आघाडी मिळवून दिली. अखेरच्या दोन मिनिटांत अन्वरने संघाचा चौथा गोल नोंदवत जेतेपदावर श्क्किामोर्तब केले.
महिलांच्या अंतिम सामन्यात ४९ व्या सेकंदाला मुमताज खान हिने भारताकडून गोल नोंदविताच प्रेक्षक सुन्न झाले होते. अर्जेंटिनाने मात्र संयम बाळगून सहा मिनिटानंतर बरोबरी साधणारा गोल केला. नवव्या मिनिटाला त्यांचा आणखी एक गोल झाला. उत्तरार्धात दुसºया मिनिटाला गोल नोंदवून अर्जेंटिनाने मिळवलेली आघाडी अखेरपर्यत कायम राखली.