सुनीता लाक्राकडे भारतीय महिला हॉकी संघाचे नेतृत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 04:45 AM2018-05-03T04:45:18+5:302018-05-03T04:45:18+5:30
बचाव फळीतील अनुभवी खेळाडू सुनीता लाक्रा हिच्याकडे आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले
नवी दिल्ली : बचाव फळीतील अनुभवी खेळाडू सुनीता लाक्रा हिच्याकडे आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. कोरियातील डोंघाय सिटी येथे १३ मेपासून स्पर्धेचे आयोजन होत आहे.
नियमित कर्णधार राणी रामपालच्या अनुपस्थितीत सुनीता १८ सदस्यीय संघाचे नेतृत्व करेल. राणीला या स्पर्धेसाठी विश्रांती देण्यात आली असून, गोलकीपर सविता उपकर्णधार असेल.
बचावफळीची भिस्त दीपिका, दीपग्रेस एक्का, सुमन देवी, गुरजित कौर यांच्याकडे तर मधल्या फळीची जबाबदारी मोनिका, नमिता टोप्पो, निक्की प्रधान, नेहा गोयल, लिलिमा मिंझ, उदिता आणि नवज्योत कौर यांच्यावर असेल.
२०१६ मध्ये चीनला पराभूत
करीत आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा भारतीय संघ यंदा राष्टÑकुल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचला होता. २०१७ मध्ये भारत आशिया चषकाचा विजेता होता. यंदा १३ मे रोजी जपानविरुद्ध भारताला सलामीचा सामना खेळायचा आहे.
संघाचे कोच बनल्यानंतर
मारिन शोर्ड यांची ही पहिलच
स्पर्धा असेल. मागील आठ महिने
ते पुरुष संघासोबत होते.
राष्टÑकुलनंतर हरेंद्रसिंग यांच्याकडे
पुरुष संघाचे कोचपद सोपविण्यात आले.
(वृत्तसंस्था)