Tokyo Olympics: वडिलांची दिवसाला ८० रु. कमाई, स्टीक्स खरेदीसाठी नव्हते पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 06:27 AM2021-08-03T06:27:11+5:302021-08-03T06:27:54+5:30

Tokyo Olympics Update: ज्याच्याकडून पास होण्याची अपेक्षा नव्हती तोच संघ थेट उपांत्य फेरीत प्रवेश मिळवून गेला अन् इतिहास घडवला... भारतीय महिलांच्या या अविश्वसनिय कामगिरीमागे प्रशिक्षक शोर्ड मारिन आणि कर्णधार राणी रामपाल यांचा सिंहाचा वाटा आहे...

Tokyo Olympics: Dad earns Rs 80 a day. Earnings, no money to buy steaks | Tokyo Olympics: वडिलांची दिवसाला ८० रु. कमाई, स्टीक्स खरेदीसाठी नव्हते पैसे

Tokyo Olympics: वडिलांची दिवसाला ८० रु. कमाई, स्टीक्स खरेदीसाठी नव्हते पैसे

Next

नवी दिल्ली : महत्त्वाच्या परिक्षेत हुशार मुलांकडून फार अपेक्षा असतात, त्यामुळे ढ किंवा ॲव्हरेज मुलांकडे कोणाचं लक्षच नसतं... तसेच टोकियोत दाखल होण्यापूर्वी हा महिला संघ ढ किंवा ॲव्हरेज मुलांमध्येच होता आणि नेमबाज, तिरंदाज, बॉक्सर हुशार विद्यार्थ्यांमध्ये होते. झालं उलटंच इथे ज्याच्याकडून पास होण्याची अपेक्षा नव्हती तोच संघ थेट उपांत्य फेरीत प्रवेश मिळवून गेला अन् इतिहास घडवला... भारतीय महिलांच्या या अविश्वसनिय कामगिरीमागे प्रशिक्षक शोर्ड मारिन आणि कर्णधार राणी रामपाल यांचा सिंहाचा वाटा आहे...
राणीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची कामगिरी ही २०१७ पासून उंचावत गेली अन् त्याचे पहिले फळ रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत मिळाले. ३६ वर्षांनंतर भारतीय महिलांनी ऑलिम्पिकची पात्रता मिळवली अन् आज थेट उपांत्य फेरी गाठली. मला माझ्या आयुष्यातून सुटका हवी होती, घरात वीज नाही, झोपल्यानंतर कानाजवळ भुणभुण करणारे डास, दोन वेळच्या जेवणाची भ्रांत, पावसाळ्यात तर घराचे तलाव बनायचे... अशा परिस्थिती राणी रामपाल लहानाची मोठी झाली. कुटुंबीयांनी तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जंगजंग पछाडले... वडिल कार्ट पुलर होते आणि आई घरकाम करायची.
तिच्या घरानजीकच हॉकी अकादमी होती आणि मी दिवसाचे बरेच तास तेथे सराव करणाऱ्या खेळाडूंना बघण्यात घालवायचे, असे राणी सांगते. ती म्हणाली,'' मलाही तेव्हा खेळावं असे वाटायचे, परंतु पप्पा दिवसाला ८० रुपये कमवायचे अन् त्यांना हॉकी स्टीक्स घेणे परवडणारे नव्हते. 

मला हॉकी शिकवा, अशी विनवणी मला प्रशिक्षकांकडे करावी लागायची, अक्षरशः मी त्यांच्याकडे त्यासाठी भीकही मागितली, परंतु त्यांनी मला नकार दिला. कारण, मी कुपोषित वाटत होते आणि तुझ्या तेवढी ताकद नाही असे त्यांनी मला सांगितले.''

एक दिवस तिला तुटलेली हॉकी स्टीक्स मिळाली आणि तिनं सरावाला सुरुवात केली. तिच्याकडे सरावासाठीचे कपडेही नव्हते, तेव्हा ती सलवार कमीज घालून मैदानावर पळायची, तिला स्वतःला सिद्ध करायचे होते. बरेच प्रयत्न केल्यानंतर प्रशिक्षकांनीही तिला ट्रेनिंग देण्यास होकार दिला.

पण, हे सर्व जेव्हा घरी सांगितले, तेव्हा घरचे म्हणाले, ''लडकिंया घर का काम करती है. हम तुम्हे स्कर्ट पेहेन कर खेलने नही देंगे.'' पण, तिनं निर्धार केला अन् घरच्यांना सांगितले की, मी अयशस्वी ठरले, तर तुम्ही जे सांगाल ते करेन.'' ''पहाटे सरावाला सुरुवात व्हायची, परंतु आमच्या घरी घड्याळही नव्हते. आकाशाकडे बघून अंदाज बांधत मी सकाळी उठायचे. हॉकी अकादमीत प्रत्येक खेळाडूला अर्धा लिटर दूध आणणे कम्पलसरी होतं. माझ्या घरच्यांना फक्त २००ml दूध घेणेही परवडणारे होता आणि कोणाला न सांगता मी त्यात पाणी मिसळून न्यायचे. कारण मला खेळायचे होते,''असे राणी म्हणाली. तिचा हा निर्धार पाहून प्रशिक्षकांनीही तिच्यासाठी नवी हॉकी स्टीक्स व शूज खरेदी केले.
 

Web Title: Tokyo Olympics: Dad earns Rs 80 a day. Earnings, no money to buy steaks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.