आगामी राष्ट्रकुलच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 11:42 PM2018-03-02T23:42:13+5:302018-03-02T23:42:13+5:30
भारतीय महिला हॉकी संघ ५ सामन्यांची मालिका खेळण्यासाठी शुक्रवारी जिनचुंन (कोरिया) दौ-यावर रवाना झाला.
नवी दिल्ली : भारतीय महिला हॉकी संघ ५ सामन्यांची मालिका खेळण्यासाठी शुक्रवारी जिनचुंन (कोरिया) दौ-यावर रवाना झाला. एतिहासिक एशिया चषक जिंकल्यानंतर भारतीय महिलांचा हा पहिला दौरा असेल. या वेळी कर्णधार राणी म्हणाली, ‘‘आगामी राष्टÑकुल स्पर्धेच्या दृष्टीने आमच्यासाठी हा दौरा महत्त्वपूर्ण असेल. कारण एशिया चषक जिंकल्यानंतर आमचा संघ फक्त स्थानिक संघांविरुद्ध खेळला आहे. बंगळुरू येथे सरावादरम्यान मार्गदर्शक हरिंदरसिंग यांनी संघाच्या तंदुरुस्तीकडे जास्त लक्ष दिले आहे. याचबरोबर एशिया चषक स्पर्धेच्या वेळी ज्या चुका झाल्या, त्यावर अभ्यास करून घेतला आहे. राष्टÑकुल स्पर्धेत संघ चांगली कामगिरी करेल, असा विश्वास राणीने व्यक्त केला.