हॉकीपटू आकाशवर दोन वर्षांची बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 06:54 AM2018-10-20T06:54:46+5:302018-10-20T06:54:53+5:30
नवी दिल्ली : राष्ट्रीय डोपिंग एजन्सीने (नाडा) हॉकी गोलकिपर आकाश चिकटेवर वर्षाच्या सुरुवातीला बंदी असलेल्या पदार्थाच्या सेवनप्रकरणी दोन वर्षांसाठी ...
नवी दिल्ली : राष्ट्रीय डोपिंग एजन्सीने (नाडा) हॉकी गोलकिपर आकाश चिकटेवर वर्षाच्या सुरुवातीला बंदी असलेल्या पदार्थाच्या सेवनप्रकरणी दोन वर्षांसाठी निलंबनाची कारवाई केली आहे. चिकटेला नाडाने २७ मार्चपासून अस्थायी स्वरुपात निलंबित केले होते आणि ८ आॅक्टोबर रोजी अंतिम सुनावणीनंतर डोपिंग विरोधी समितीने त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
चिकटेच्या चाचणीत एनाबोलिक स्टेराईड नोरेंड्रोस्टेरोन हा बंदी असलेला पदार्थ आढळला. ही चाचणी २७ फेब्रुवारीला बेंगळुरूमध्ये वरिष्ठ हॉकी संघाच्या शिबिरात घेण्यात आली होती. एजन्सीच्या संकेतस्थळावर गुरुवारी हा अंतिम आदेश अपलोड करण्यात आला. त्यात डोप नियमाचे उल्लंघन मुद्दाम करण्यात आले नव्हते. कारण त्याच्या डाव्या पायाला दुखापत झाली होती. त्यासाठी त्याने औषध घेतले होते. अन्य सहा खेळाडूंवरही डोपिंगप्रकरणी चार वर्षांची बंदी घालण्यात आली.