महिला हॉकीची धुरा राणीकडे, २० सदस्यांच्या भारतीय संघाची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 03:19 AM2018-02-24T03:19:43+5:302018-02-24T03:19:43+5:30
कोरियात होणा-या हॉकी मालिकेसाठी अनुभवी स्ट्रायकर राणी रामपाल हिच्याकडे भारतीय संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. या मालिकेसाठी २० खेळाडूंची घोषणा करण्यात आली.
नवी दिल्ली : कोरियात होणा-या हॉकी मालिकेसाठी अनुभवी स्ट्रायकर राणी रामपाल हिच्याकडे भारतीय संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. या मालिकेसाठी २० खेळाडूंची घोषणा करण्यात आली.
भारतीय संघ ३ ते १२ मार्च यादरम्यान कोरियामध्ये पाच सामने खेळणार आहे. आघाडीपटू पूनम राणीचे संघात पुनरागमन झाले आहे. बचावपटू सुनीता लाकडा हिच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या दौºयासाठी गोलरक्षक सविताला विश्रांती देण्यात आली आहे. रजनी ई. आणि नवोदित स्वातीवर गोलरक्षणाची जबाबदारी असणार आहे.
मागील वर्षी आशिया चषक स्पर्धेत चीनला पराभूत केल्यानंतर भारताचा हा पहिला दौरा आहे. मुख्य प्रशिक्षक हरेंद्रसिंग म्हणाले, ‘कोरिया दौºयात आम्हाला राष्टÑकुल स्पर्धेची तयारी करण्यासाठी चांगली संधी आहे. या दौºयात संघात कोणत्या उणिवा आहेत हे समजण्यास मदत होईल. संघात युवा खेळाडूंचा समावेश आहे. यातील बहुतांश खेळाडूंनी राष्टÑीय स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे.’ (वृत्तसंस्था)
गोलरक्षक : रजनी इतिमारपू, स्वाती
बचावपटू : दीपिका, सुनीता लाकडा, दीप ग्रेस इक्का, सुमन देवी, गुरजित कौर, सुशिला चानू
मधली फळी : मोनिका, नमिता टोप्पो, निक्की प्रधान, नेहा गोयल, लिलिमा मिज, उदिता,
आघाडीपटू : राणी (कर्णधार), वंदना कटारिया, लालरेम सियामी, नवज्योत कौर, नवनीत कौर, पूनम राणी.