विश्वचषक हॉकी स्पर्धा : दोन्ही संघांचे प्रत्येकी १ गोल,स्पेन-फ्रान्स लढत ड्रॉ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 04:34 AM2018-12-04T04:34:43+5:302018-12-04T04:34:51+5:30

कर्णधार आणि गोलरक्षक क्विको कोर्टेस याच्या पेनल्टी स्ट्रोकवर करण्यात आलेल्या शानदार बचावाच्या बळावर स्पेनने फ्रान्सविरुद्ध सोमवारी येथे पुरुष विश्वचषक हॉकीच्या अ गटातील सामना १-१ असा ड्रॉ केला.

World Cup hockey tournament: each one of the two teams, Spain-France draw draws | विश्वचषक हॉकी स्पर्धा : दोन्ही संघांचे प्रत्येकी १ गोल,स्पेन-फ्रान्स लढत ड्रॉ

विश्वचषक हॉकी स्पर्धा : दोन्ही संघांचे प्रत्येकी १ गोल,स्पेन-फ्रान्स लढत ड्रॉ

googlenewsNext

भुवनेश्वर : कर्णधार आणि गोलरक्षक क्विको कोर्टेस याच्या पेनल्टी स्ट्रोकवर करण्यात आलेल्या शानदार बचावाच्या बळावर स्पेनने फ्रान्सविरुद्ध सोमवारी येथे पुरुष विश्वचषक हॉकीच्या अ गटातील सामना १-१ असा ड्रॉ केला.
ही लढत ड्रॉ झाल्यामुळे दोन्ही संघांच्या बाद फेरीत पोहोचण्याच्या आशा जिवंत आहेत. दोन्ही संघांचे दोन सामन्यात प्रत्येकी १ गुण झाले आहे.
जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावरील स्पेन आणि स्पर्धेतील सर्वात तळातील रँकिंग असणाऱ्या २0 व्या क्रमांकावरील फ्रान्स यांच्यात हा सामना होता; परंतु ही लढत खूप चुरशीची पाहायला मिळाली. फ्रान्सने आपल्या प्रतिस्पर्धी संघाला कडवी झुंज दिली.
फ्रान्सने टिमोथी क्लेमेंटने सहाव्या मिनिटाला मैदानी गोल करीत स्पेनला संकटात टाकले. त्यांनी तिसºया क्वार्टरपर्यंत ही आघाडी कायम ठेवली. मध्यंतरानंतर स्पेनने चांगला खेळ केला. त्यांच्याकडून अल्वारो इग्लेसियासने ४८ व्या मिनिटाला बरोबरीचा गोल केला. फ्रान्सजवळ स्पर्धेतील सर्वात खळबळजनक निकाल नोंदवण्याची सुवर्णसंधी होती; परंतु स्पेनचा कर्णधार कार्टेस हा आपल्या संघाच्या बचावासाठी पुढे आला. स्पेनचाच्या खेळाडूला गोलपोस्टवर अडथळा आणल्यामुळे फ्रान्सला व्हिडिओ रेफरलद्वारे पेनल्टी स्ट्रोक मिळाला; परंतु कोर्टेस याने ह्यूगो जेनेस्टेटचा फटका यशस्वीपणे थोपवला. स्पेन त्यांच्या पहिल्या सामन्यात आॅलिम्पिक चॅम्पियन अर्जेंटिनाकडून ३-४ ने पराभूत झाला होता तर फ्रान्सला न्यूझीलंडकडून १-२ गोलने पराभवाची चव चाखावी लागली होती. स्पेनचा त्यांच्या गटातील अखेरचा सामना ६ डिसेंबरला न्यूझीलंडशी होणार आहे तर फ्रान्सची लढत अर्जेंटिनाशी होईल.
>अर्जेंटिनाची न्यूझीलंडवर ३-० गोलने मात
आॅलिम्पिक चॅम्पियन्स अर्जेंटिनाने सोमवारी विश्वचषक हॉकी स्पर्धेत थेट उपांत्यपूर्व फेरीत पोहोचण्याकडे वाटचाल करताना सोमवारी न्यूझीलंड संघावर ३-0 गोलने मात केली आहे. या लढतीत अर्जेंटिनाने पूर्ण वर्चस्व राखले. त्यांच्याकडून आॅगस्टीन मझ्झीलीने २३ व्या, लुकास व्हिल्लाने ४१ व्या आणि लुकास मार्टिनेझने ५५ व्या मिनिटाला गोल केले. कलिंगा स्टेडियमवर झालेल्या या लढतीतील विजयाने अर्जेंटिनाने पूर्ण तीन गुण वसूल केले.

Web Title: World Cup hockey tournament: each one of the two teams, Spain-France draw draws

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.