Youth Olympic Games 2018 : भारतीय मुलींना रौप्यपदकावर समाधान, अर्जेंटिनाकडून हार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 08:33 AM2018-10-15T08:33:09+5:302018-10-15T08:33:23+5:30
Youth Olympic Games 2018 : युवा ऑलिम्पिक स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या भारतीय मुलींच्या हॉकी संघाने रौप्यपदकाची कमाई केली.
ब्युनोस आयरिस : युवा ऑलिम्पिक स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या भारतीय मुलींच्या हॉकी संघाने रौप्यपदकाची कमाई केली. अंतिम सामन्यात त्यांना यजमान अर्जेंटिनाकडून 1-3 असा पराभव पत्करावा लागला.
Youth Olympic Games | Hockey5s: Indian girls go down 1-3 to host Argentina in Final.
— India_AllSports (@India_AllSports) October 15, 2018
Settle for Silver medal #YouthOlympics#BuenosAires2018pic.twitter.com/t4LlbTFv1F
भारतीय संघाने दणक्यात सुरूवात करताना पहिल्याच मिनिटाला 1-0 अशी आघाडी घेतली. परंतु, त्यानंतर यजमान संघाकडून झालेले आक्रमण थोपवण्यात भारतीय खेळाडूंना अपयश आले. 6 व्या मिनिटाला जियानेल्लाने अर्जेंटिनाला 1-1 अशी बरोबरी मिळवून दिली. त्यात सोफिया ( 9 मि.) आणि ब्रिसा ( 12 मि.) यांनी भर घालत अर्जेंटिनाची आघाडी मजबूत केली. ही पिछाडी भरून काढण्यात भारतीय संघ अपयशी ठरला आणि त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
Congratulations to the Indian U-18 Women's Hockey Team for winning the Silver medal of the women's Hockey5s event at the 3rd Youth Olympic Games @BuenosAires2018 on their very first campaign in the competition which concluded on 15th October 2018.#IndiaKaGamepic.twitter.com/Ny82oS7i6g
— Hockey India (@TheHockeyIndia) October 14, 2018