Lokmat Infra Conclave Agenda: आदित्य ठाकरेंसह राज्याचे मंत्री, अधिकारी मांडणार महाराष्ट्राचं 'इन्फ्रा व्हिजन'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2021 06:05 PM2021-12-07T18:05:11+5:302021-12-07T18:05:18+5:30
महाराष्ट्राच्या शहरी आणि ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांची सद्यस्थिती, राज्य सरकारचं - प्रशासनाचं 'इन्फ्रा व्हिजन', रस्ते बांधणी, कोस्टल रोड, गृहनिर्माण प्रकल्प, औद्योगिक विकासाच्या योजना याबाबतचं भविष्यातील नियोजन आदी विषयांवर विचार मंथन करण्यासाठी ‘लोकमत इन्फ्रा कॉन्क्लेव्ह’चं आयोजन करण्यात आलं आहे.
महाराष्ट्राच्या शहरी आणि ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांची सद्यस्थिती, राज्य सरकारचं - प्रशासनाचं 'इन्फ्रा व्हिजन', रस्ते बांधणी, कोस्टल रोड, गृहनिर्माण प्रकल्प, औद्योगिक विकासाच्या योजना याबाबतचं भविष्यातील नियोजन आदी विषयांवर विचार मंथन करण्यासाठी ‘लोकमत इन्फ्रा कॉन्क्लेव्ह’चं आयोजन करण्यात आलं आहे. उद्या, ८ डिसेंबरला मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये ही परिषद होणार आहे.
राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल, शिर्डी संस्थानच्या सीईओ भाग्यश्री बानायत यांच्यासह अनेक आयएएस अधिकारी लोकमत इन्फ्रा कॉन्क्लेव्हमध्ये आपलं व्हिजन मांडणार आहेत, प्रेझेन्टेशन सादर करणार आहेत.
९.३० पासून | प्रतिनिधींची नोंदणी | |
१०.३०-१०.४० | स्वागत आणि प्रास्ताविक | श्री. विजय दर्डा, संसद सदस्य, (१९९८-२०१६), चेअरमन, लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेड |
महाराष्ट्रातील नागरी पायाभूत सुविधांची उभारणी | ||
१०.४०-१०.५० | विकासासाठी रस्त्यांची निर्मिती | श्री. राधेश्याम मोपालवार, आयएएस, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी |
१०.५०-११.०० | शहर विकास - महाराष्ट्र व्हिजन २०२५ | श्री भूषण गगराणी, आयएएस, प्रधान सचिव (नगरविकास), महाराष्ट्र सरकार |
११.००-११.१० | मुख्य भाषण - महाराष्ट्रातील नागरी पायाभूत सुविधांची उभारणी | श्री एकनाथ शिंदे, नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री, महाराष्ट्र सरकार |
महाराष्ट्रात शाश्वत औद्योगिक पायाभूत सुविधांची उभारणी | ||
११.१०-११.२० | छोट्या शहरांमध्ये उद्योगांचे जाळे तयार करणे - आव्हाने आणि उपाय | डॉ पी अनबलगन, आयएएस, मुख्य कार्यकारी अधिकारी, एमआयडीसी |
११.२०-११.३० | महामुंबई मेट्रो प्रकल्प - भविष्यातील लाईफलाईनची मार्गक्रमणा | डॉ. सोनिया सेठी, आयएएस, अतिरिक्त महानगर आयुक्त, महामुंबई मेट्रो प्रकल्प |
११.३०-११.४० | मुख्य भाषण - महाराष्ट्राची शाश्वत औद्योगिक पायाभूत सुविधा उभारणे २०२५ | श्री. सुभाष देसाई, उद्योग आणि खाण मंत्री, महाराष्ट्र सरकार |
महाराष्ट्र - व्हिजन २०२५ | ||
११.४०-११.५० | कोस्टल रोड - रिडिफायनिंग मुंबई | श्री. इक्बाल सिंग चहल, आयएएस, आयुक्त, मुंबई महानगरपालिका |
११.५०-१२.०० | औद्योगिक विकासासह पर्यावरणाचा समतोल राखणे | श्रीम. मनिषा म्हैसकर, आयएएस, प्रधान सचिव (पर्यावरण), महाराष्ट्र सरकार |
१२.००-१२.१० | चर्चा - महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चर व्हिजन २०२५ | श्री. ऋषी दर्डा, संपादकीय आणि सहव्यवस्थापकीय संचालक, लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेड हे श्री. आदित्य ठाकरे, पर्यावरण, पर्यटन मंत्री, महाराष्ट्र सरकार, यांच्याशी संवाद साधतील. |
महसूल आणि गृहनिर्माणापुढील आव्हाने | ||
१२.१०-१२.२० | सिडको - नवी मुंबईच्या संभाव्यतेचा शोध | डॉ संजय मुखर्जी, आयएएस, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, सिडको |
१२.२०-१२.३० | गृहनिर्माण - सर्वांसाठी घर | श्री. मिलिंद म्हैसकर, आयएएस, प्रधान सचिव (गृहनिर्माण), महाराष्ट्र सरकार |
१२.३०-१२.४० | गृहनिर्माण विभाग - व्हिजन २०२५ | श्री. जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण मंत्री, महाराष्ट्र सरकार |
१२.४०-१२.५० | महाराष्ट्राच्या विकासासाठी महसूलाचा रोडमॅप | श्री. बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री, महाराष्ट्र सरकार |
१२.५०-१२.५५ | 'माय सिटी, माय डिपी' - सादरकर्ते | श्री. ्अभिजित बांगर, आयएएस, आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका |
१२.५५-१.०० | 'माय सिटी, माय डिपी' - सादरकर्ते | डॉ विपिन शर्मा, आयएएस, आयुक्त, ठाणे महानगरपालिका |
१.००-१.०५ | ‘केस स्टडी – धार्मिक जागांच्या पायाभूत सुविधांचा विकास’ – सादरकर्ते | श्रीम. भाग्यश्री बनायत, आयएएस, मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री साईं बाबा संस्थान ट्रस्ट (शिर्डी) |
१.०५-१.१५ | सांगता आणि आभार | श्री. राजेंद्र दर्डा, मुख्य संपादक, लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेड |