म्हाडाच्या नवीन प्रकल्पांमध्ये मेडिकल फॅसेलिटी उभारणार; जितेंद्र आव्हाड यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 03:13 PM2021-12-08T15:13:01+5:302021-12-08T17:06:16+5:30

'25 वर्षानंर बीडीडी चाळीच्या डेव्हलपमेंटची सुरुवात झाली, येत्या काळात बीबीडी नायगाव, बीबीडी एनएम जोशी आणि बीडीडी वरळी याचेही काम सुरू होईल.'

Lokmat Infra Conclave; Various projects will be started under MHADA, information of Housing Minister Jitendra Awhad | म्हाडाच्या नवीन प्रकल्पांमध्ये मेडिकल फॅसेलिटी उभारणार; जितेंद्र आव्हाड यांची माहिती

म्हाडाच्या नवीन प्रकल्पांमध्ये मेडिकल फॅसेलिटी उभारणार; जितेंद्र आव्हाड यांची माहिती

googlenewsNext

मुंबई:मुंबई:लोकमततर्फे आज 'लोकमत इन्फ्रा कॉनक्लेव्ह' 'महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप' या कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी कार्यक्रमाला महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, उद्योगमंत्री सुभाष देसाई, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडासंबंधीत महत्वाची माहिती दिली.

सामान्यांना हक्काचे घर मिळण्याची प्रक्रिया सोपी केली
यावेळी आव्हाड म्हणाले की, आम्ही इज ऑफ डूइंग बिझनेस संदर्भात मीटिंग घेतली आणि सामान्यांना मुंबईत त्यांचे हक्काचे घर कसे मिळवता येईल, यासाठी विविध निर्णय घेतले. आमचे सरकार येण्याच्या आधी दहा वर्षात म्हाडाने फक्त दोनशे एलओेलआय दिले. पण, आमचे सरकार आल्यानंतर फक्त दोन वर्षात आम्ही 200 एलओआय दिले आहेत. याशिवाय, आम्ही फाइलींची संख्या कमी केली, म्हणजेच सामान्य व्यक्तीला घर मिळवण्यात काही अडचण येणार नाही, याची काळजी घेतली. याशिवाय, 25 वर्षानंर बीडीडी चाळीच्या डेव्हलपमेंटची सुरुवात झाली आहे.  मला विश्वास आहे की येणाऱ्या काळात बीबीडी नायगाव, बीबीडी एनएम जोशी आणि बीडीडी वरळी याचेही काम सुरू होईल. 

म्हाडाद्वारे इमारती डेव्हलप होणार
ते पुढे म्हणाले की, मुंबईत विशेषतः दक्षिण मुंबईत कित्येक दशके जुन्या इमारती आहेत. यासाठी आम्ही कायदा केलाय, राष्ट्रपतींकडे याची फाईल आहे. त्या फाईलवर त्यांची सही होणे बाकी आहे. यासंदर्भात राष्ट्रपती भवनालाही पत्र लिहीले आहे. हा कायदा आल्यानंतर आम्हाला विविध मालमत्ता कायद्याने मिळवून म्हाडाद्वारे डेव्हलप करणार आहोत. तसेच, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इमारतीमध्ये जवळपास पाच हजार स्केअर फुटची जागा मेडिकल फॅसेलिटीसाठी राखीव असेल, अशीही माहिती त्यांनी दिली.

शिवडी-उरण परिसरात वसाहत निर्माण होणार
ते पुढे म्हणाले की, सध्या मुंबईत कुठेच खासगी जागा उपलब्ध नाही. ज्या जागा आहेत, त्यातील बहुतांश जागा म्हाडाकडे आहेत. मुंबईत अनेक ठिकाणी म्हाडाच्या वसाहती आहेत, त्या वन बिल्डींग डेव्हलपमेंट बंद करणार आहोत. संपूर्ण म्हाडाला एकदाच डेव्हलप करण्याची योजना आहे. एक-एक बिल्डींग डेव्हलप करणे अवघड आहे. मुंबई आता वाढू शकत नाही, तिकडे शिवडी-उरण परिसरात खूप जमिनी आहेत. येत्या काळात तिकडे वसाहती होणार आणि कनेक्टर रोड झाल्यानंतर शिवडीवरुन मुंबईला यायला फक्त 20 मिनिटे लागणार, ही महत्वाची माहितीही त्यांनी यावेळी दिली. 

आवास योजना सुरू करणार
यावेळी आव्हाडांनी आवास योजना सुरू करणार असल्याची माहिती दिली. ते म्हणाले की, गेल्या 25 वर्षापासून हाउसिंग डिपार्टमेंट मुख्यमंत्र्याकडे असायचे. मुख्यमंत्र्यांकडे इतक्या फाइल यायच्या की, हाउसिंगला वेळ मिळायचा नाही. पण, अनेक वर्षानंतर हाउसिंगला स्वतंत्र मंत्री मिळाला. मी आता लवकरच 'आवास योजना' सुरू करतोय. मुंबईतल्या झोपडपट्ट्याबाबत असलेल्या 523 योजना बंद पडल्यात, त्यांची सुरुवात करण्यासाठी महत्वाचा निर्णय घेत आहोत. याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाले आहे, लवकर यावर निर्णय होऊ शकतो, अशीही माहिती त्यांनी दिली.
 

Web Title: Lokmat Infra Conclave; Various projects will be started under MHADA, information of Housing Minister Jitendra Awhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.