...तर १५ ते २० फेब्रुवारीपर्यंत १०० टक्के मुंबईकरांना दुसरा डोसही देऊ! : आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 01:28 PM2021-12-08T13:28:39+5:302021-12-08T13:29:08+5:30

मंगळवारी आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना लसीकरणासंदर्भात लिहिलं होतं पत्र.

maharashtra minister aditya thackeray speaks on it is possible to vaccinate mumbaikars by 20 feb | ...तर १५ ते २० फेब्रुवारीपर्यंत १०० टक्के मुंबईकरांना दुसरा डोसही देऊ! : आदित्य ठाकरे

...तर १५ ते २० फेब्रुवारीपर्यंत १०० टक्के मुंबईकरांना दुसरा डोसही देऊ! : आदित्य ठाकरे

googlenewsNext

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांना मंगळवारी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासंदर्भात एक पत्र लिहिलं होतं. ओमायक्रॉनचा धोका वाढत असताना ठाकरेंनी केंद्रीय मंत्र्यांना पत्र लिहून काही महत्त्वाच्या शिफारशीही केल्या होत्या. तर दुसरीकडे सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियानंदेखील आपल्याकडे लसींचा साठा उपलब्ध असल्याचं सांगितलं होतं. दरम्यान, यासंदर्भात पर्यटन, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. दरम्यान, १५ ते २० फेब्रुवारीपर्यंत सर्व मुंबईकरांना लसीचा दुसरा डोस देणं शक्य असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.
 
"सध्या शाळा सुरू करण्याचीही गरज वाटते आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून मुलं घरी आहेत. माझी अनेकदा पालकांशी चर्चाही झाली आहे. आपल्याला १५ ते २० फेब्रुवारीपर्यंत सर्व मुंबईकरांना लसीचा दुसरा डोस देणं शक्य असून यासाठी लसींच्या दोस डोसमधील कालावधी कमी करणं आवश्यक आहे," असं मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं.

 
केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना लिहिलं होतं पत्र 
वर्षाच्या सुरुवातीला कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या फ्रंट लाईन आणि हेल्थकेअर वर्कर्सना त्यांच्या इच्छेनुसार तिसरा डोस घेण्याची परवानगी द्यावी, असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे. कोरोना लस घेण्यासाठी असलेली वयाची मर्यादा १५ वर्षांपर्यंत करावी. त्यामुळे माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या मुलांना, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना लस मिळू शकेल, असं ठाकरेंनी पत्रात नमूद केलंय.

कोरोना लसीच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याबद्दल विचार करण्याची विनंतीदेखील आदित्य ठाकरेंनी केंद्रीय मंत्र्यांकडे केली आहे. 'दोन डोसमधील अंतर ४ आठवड्यांवर आणण्यात यावं. त्यामुळे मुंबईतील १०० टक्के नागरिकांचं लसीकरण जानेवारी २०२२ च्या मध्यापर्यंत पूर्ण होईल,' असं आदित्य यांना पत्रात नमूद केलं आहे. सध्या मुंबईत १०० टक्के नागरिकांना पहिला डोस मिळाला असून दोन्ही डोस मिळालेल्या नागरिकांचं प्रमाण ७३ टक्के इतकं आहे, अशी आकडेवारीदेखील आदित्य ठाकरे यांनी पत्रात मांडली आहे.

Web Title: maharashtra minister aditya thackeray speaks on it is possible to vaccinate mumbaikars by 20 feb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.