३५० रुपयांना बनवली कंपनी अन् आज वार्षिक ५ कोटींची कमाई; वाचा युवकाची संघर्षगाथा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 01:14 PM2023-03-12T13:14:33+5:302023-03-12T13:14:43+5:30

सरकारी नोकरीची तयारी करावी अशी वडिलांची इच्छा होती. परंतु माझं मन या गोष्टीत लागत नव्हते असं हर्षवर्धनने म्हटलं.

A company built at Rs 350 and today earning 5 crores annually; Read the struggle story of the Harshwardhan Mishra go easy | ३५० रुपयांना बनवली कंपनी अन् आज वार्षिक ५ कोटींची कमाई; वाचा युवकाची संघर्षगाथा

३५० रुपयांना बनवली कंपनी अन् आज वार्षिक ५ कोटींची कमाई; वाचा युवकाची संघर्षगाथा

googlenewsNext

जेवण मागवायचं...कपडे खरेदी करायचेत...तर ऑनलाईन ऑर्डर करा. इलेक्ट्रिशन, कारपेंटर, प्लंबर यांची आवश्यकता असेल तर ऑनलाईन बुकींग करा. सध्या प्रत्येक गरजेच्या वस्तूंसाठी ऑनलाईन पर्याय उपलब्ध झाला आहे. परंतु आतापर्यंत इलेक्ट्रिशन, कारपेंटर, प्लंबर, ब्यूटीशियनसारख्या होम सर्व्हिस मोठ्या शहरातच मिळत होत्या. पण गावात त्याचे प्रमाण कमी होते. 

याच समस्येवर काम करण्यासाठी मध्य प्रदेशातील भोपाळ येथे राहणाऱ्या हर्षवर्धन मिश्रा यांनी पुढाकार घेतला. भोपाळ आणि जमशेदपूरमध्ये त्यांनी ऑनलाईन होम सर्व्हिस सुरू केली. हर्षवर्धन इलेक्ट्रिशन, कारपेंटर, ब्यूटिशियनसह ६ पेक्षा अधिक ऑनलाईन सर्व्हिस देतो. २०१७ मध्ये अवघ्या ३५० रुपयांत Go Easy नावानं स्टार्टअप सुरू केले. आज त्यांच्या या कंपनीचा वार्षिक टर्नओव्हर ५ कोटी रुपयांचा आहे. 

दुपारची वेळ, भोपाळ येथील ऑफिसमध्ये हर्षवर्धन टीमसह मिटिंग करत होते. सध्या मार्च महिना सुरू आहे. त्यामुळे ईयर क्लोजिंगचं काम सुरू आहे. कामाचा ताण आहे. पुढील आर्थिक वर्षापासून सर्व्हिसमध्ये काही बदल केले जातील असं हर्षवर्धन यांनी सांगितले. २०१६-१७ मध्ये इंजिनिअरिंग केल्यानंतर हर्षवर्धन दिल्लीत जॉब करत होता. जवळपास अडीच वर्ष खासगी कंपनीत काम केले. त्याठिकाणी ना इज्जत मिळत होती ना पैसा. अचानक मी नोकरी सोडण्याचा निर्णय घेत भोपाळला आलो असं त्याने सांगितले. 

सरकारी नोकरीची तयारी करावी अशी वडिलांची इच्छा होती. परंतु माझं मन या गोष्टीत लागत नव्हते. मी बॅकबँचेर स्टूडेंट होतो. त्यामुळे ५-६ हजारांची नोकरी मिळाली तरी मोठी बाब होती. एकदा घरात इलेक्ट्रिशन आणि प्लंबरची आवश्यकता भासली. परंतु कुणीच मिळत नव्हते. मी दिल्लीत राहायचो त्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी ऑनलाईन बुकींग करण्याची सवय लागली होती. मोठ्या शहरात अर्बन क्लॅपसारख्या संस्था होम सर्व्हिस प्रोव्हाईड करतात. परंतु छोट्या शहरात अशा कुठल्याही सर्व्हिस नाहीत. 

खूप वेळाने वडिलांनी एका मजुराला आणले. काम केल्यानंतर त्याने दुप्पट पैसे घेतले. तेव्हा ज्यारितीने मला समस्येला तोंड द्यावे लागले तसेच लहान शहरात, गावात राहणाऱ्यांना द्यावे लागत असेल असा विचार माझ्या मनात आला. पुढील दिवसापासून मी ऑनलाईन होम सर्व्हिस प्रोव्हाईड करण्यासाठी उद्योग सुरू केला. मी इंजिनिअरींग फिल्डमध्ये होतो. त्यामुळे मला काहीच माहिती नव्हते. मी शहरातील कामगारांना भेटायला लागलो. अनेकदा त्यांना आयडिया सांगितली तेव्हा ते हसायचे. मी हळूहळू त्यांचा विश्वास कमावला. आज भोपाळच्या मोठमोठ्या कॉर्पोरेट हाऊसला सर्व्हिस देतो. एका साईटहून ५ ते १० लाख कमाई होते. अशा अनेक साईट्स आहेत असं हर्षवर्धन यांनी सांगितले. 

Web Title: A company built at Rs 350 and today earning 5 crores annually; Read the struggle story of the Harshwardhan Mishra go easy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.