३५ वेळा फेल झाले तरीही जिद्द सोडली नाही; पहिले IPS त्यानंतर IAS अधिकारी बनले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 04:03 PM2024-08-02T16:03:32+5:302024-08-02T16:04:25+5:30

इंजिनिअरींगचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर आयएएस अधिकारी होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या हरियाणातील युवकाची प्रेरणादायी कहाणी

Failed 35 times but never gave up; The first IPS then became an IAS officer, Story of vijay wardhan | ३५ वेळा फेल झाले तरीही जिद्द सोडली नाही; पहिले IPS त्यानंतर IAS अधिकारी बनले

३५ वेळा फेल झाले तरीही जिद्द सोडली नाही; पहिले IPS त्यानंतर IAS अधिकारी बनले

आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरण सध्या देशात चर्चेत आहे. मात्र असे अनेक आयएएस अधिकारी आहेत त्यांच्या संघर्षमय कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी बनते. आयएएस विजय वर्धन हे त्यातील एक यशस्वी नाव, ज्यांच्याबाबत यूपीएससीसह इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतलं पाहिजे. अनेकदा विद्यार्थी एकदा अथवा २ वेळा परीक्षेत अयशस्वी झाल्यास निराश होतात त्यानंतर फिल्ड सोडून इतर क्षेत्राकडे वळतात. आयएएस विजय वर्धन यांनी १-२ वेळा नाही तर तब्बल ३५ वेळा फेल होऊनही हार मानली नाही. 

विजय वर्धन हरियाणातील सिरसा जिल्ह्यात राहणारे आहेत. सुरुवातीचं शिक्षण हरियाणातूनच झाले. हिसारमधून इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरींगचं शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ३५ वेळा ते स्पर्धा परीक्षेत अपयशी ठरले. विजय वर्धन यांनी २०१८ साली यूपीएससीची परीक्षा देत १०४ वी रँक मिळवली. त्यांची निवड आयपीएस पदासाठी करण्यात आली. मात्र ते समाधानी नव्हते कारण त्यांना आयएएस बनायचं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी तयारी केली आणि २०२१ साली सीएसई परीक्षेत ७० वी रँक पटकावली. 

एका मुलाखतीत विजय वर्धन सांगतात की, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नेहमी स्वत:वर विश्वास ठेवला पाहिजे. स्वप्न आणि आकांक्षा हेच सर्वात मोठे प्रशिक्षक असतात. वारंवार येणाऱ्या अपयशातून मी कधीही निराश झालो नाही. माझ्यामधील कमतरता ओळखली, तिला दूर केले आणि पुढील शिक्षण सुरू ठेवले. अपयशानंतर कधी थांबायचं नसतं. आपण कुठे कमी पडलो ते शोधायला हवं ज्यामुळे यश मिळू शकलं नाही. जे कमी आहे ते दूर करणे आणि पुढे जात राहणं. टार्गेट बनवून तयारी केली आणि कमी भरून काढली. त्यातून मला हे यश मिळाल्याचं त्यांनी सांगितले.

दरम्यान, विजय वर्धन यांनी २०१४ साली पहिल्यांदा यूपीएससी परीक्षा दिली होती. मात्र त्यांच्या वाट्याला अपयश आलं. हे एकदा, दोनदा घडलं नाही. एकापाठोपाठ ४ वेळा त्यांनी परीक्षा दिली, त्यात अपयशी ठरले. त्यानंतर २०१८ साली पहिल्यांदा ते यूपीएससी परीक्षा पात्र ठरत १०४ वी रँक मिळवली. त्यांची आयपीएस म्हणून निवड करण्यात आली. मात्र त्यावर विजय वर्धन खुश नव्हते. आयएएस अधिकारी बनण्याचं त्यांचं स्वप्न होतं. ते २०२१ साली पूर्ण केले. 

Web Title: Failed 35 times but never gave up; The first IPS then became an IAS officer, Story of vijay wardhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.